अवजड वाहनांवर हायड्रॉलिकने कारवाई, वाहतूक पोलिसांकडून चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:26 AM2018-01-02T03:26:55+5:302018-01-02T03:27:14+5:30

‘नो पार्किंग’मधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी हातघाई करणारी निळ्या टेम्पोतील मुले आता कालबाह्य होणार आहेत. नो पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हायड्रॉलिक टेम्पोचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, चारचाकीवरील कारवाईची प्रचलित पद्धतदेखील बदलणार आहे.

 Hydraulic actions on heavy vehicles, trial by traffic police | अवजड वाहनांवर हायड्रॉलिकने कारवाई, वाहतूक पोलिसांकडून चाचणी

अवजड वाहनांवर हायड्रॉलिकने कारवाई, वाहतूक पोलिसांकडून चाचणी

Next

- विशाल शिर्के
पुणे : ‘नो पार्किंग’मधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी हातघाई करणारी निळ्या टेम्पोतील मुले आता कालबाह्य होणार आहेत. नो पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हायड्रॉलिक टेम्पोचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, चारचाकीवरील कारवाईची प्रचलित पद्धतदेखील बदलणार आहे. नुकतीच या नवीन प्रणालीची चाचणी घेण्यात आली.
नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा निळा टेम्पो शहरात सर्रास फिरताना दिसतो. नो पार्किंगमध्ये वाहन दिसले की, त्यातून काही मुले खाली उतरून भराभर हाताने वाहने उचलून टेम्पोमध्ये चढविताना दिसतात. मात्र, यातून बºयाचदा साडेतीनशे सीसीची अवजड वाहने सुटत होती. तसेच दुचाकी उचलताना ती कशीही टेम्पोत आदळत असल्याने त्यांच्या नुकसानीची शक्यतादेखील वाढत होती. टेम्पोचे मागील दार खाली घेऊन, त्याचा वापरही दुचाकी ठेवण्यासाठी केला जात होता. चारचाकी वाहने उचलताना पुढील दोन चाक एका ट्रॉलीमध्ये अडकवून, गाडी ओढून नेली जात. आता ही पद्धत बंद करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी आॅगस्ट २०१७मध्ये त्यावर एक प्रस्ताव तयार केला असून, त्याच्या कामाला आता गती आली आहे.
नो पार्किंगमधील मोपेडपासून ते २२९ किलो वजनाची कोणतीही स्पोर्ट बाईकसुद्धा सफाईदारपणे उचलता येईल, याचा विचार या प्रस्तावामध्ये करण्यात आला आहे. बुलेटसारखी अवजड दुचाकी असो की हर्ले डेव्हीडसनसारखी बाईक, त्यावरदेखील योग्य कारवाई करणे शक्य होणार आहे. छत नसलेले हायड्रॉलिक टेम्पो तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन उचलण्यासाठी अवघी एक व्यक्तीदेखील पुरेशी ठरू शकेल.
चारचाकी वाहनांवर कारवाई करतानादेखील यापूर्वी मर्यादा येत होत्या. कारवाईदरम्यान आलिशान कारचे नुकसान झाल्याच्या तक्रारी व्हयाच्या. आता अगदी स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) आणि इतर आलिशान गाड्यांवरदेखील कारवाई करता येईल. या वाहनांची चारही चाके गाडी उचलून नेणाºया व्हॅनला जोडण्यात आलेल्या ट्रॉलीवर असतील. अगदी सहाशे किलोपासून ते अडीच हजार किलो वजनाची अवजड वाहनेदेखील ओढून नेता येतील. या कारवाईसाठी शहरात १० क्रेन आणि २५ टेम्पो तैनात करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प
सध्या प्रगतिपथावर असून, त्याची निविदा काढण्याचे काम सुरू आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी तसेच, कमी दृश्यमानता असलेल्या स्थितीतदेखील काम करू शकतील.

दुचाकी उचलल्यास २०० रुपये शुल्क!
नो पार्किंगमधील वाहन उचलून नेल्यास सध्या दुचाकीसाठी ४०, तीनचाकी १०० आणि चारचाकीसाठी अडीचशे रुपये (टोर्इंग चार्जेस) शुल्क आकारले जाते. नवीन प्रणाली लागू झाल्यास दुचाकीला २०० आणि चारचाकीसाठी ४०० रुपये टोर्इंग चार्जेस आकारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या शुल्कात दोन ते चारपट वाढ होणार आहे. गाडीची कागदपत्रे, वाहन परवाना अशी कागदपत्रे नसल्यास त्याचा दंड वेगळा आकारण्यात येईल. त्यामुळे दंडात मोठी वाढणार असल्याने, टोर्इंग शुल्कवाढीस तीव्र विरोध असेल. असा प्रस्ताव मान्य करु नये, अशी मागणी लोकहित फाउंडेशनच्या अजहर खान यांनी सरकारकडे केली़

नवीन यंत्रणा का ?
पुण्याचे क्षेत्रफळ सातशे चौरस किलोमीटर असून, रस्त्याची लांबी सुमारे
२ हजार किलोमीटर इतकी आहे. शहरातही दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सप्टेंबर २०१५ अखेरीस शहरातील वाहनांची संख्या २८ लाखांवर पोहोचली होती. दरमहा सरासरी ६ हजार नवीन वाहनांची त्यात भर पडत आहे. दिवसातील ठरावीक काळात, तर एकाच वेळी ३ लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर असतात. सुरळीत वाहतुकीसाठी रस्ता अडथळामुक्त असणे गरजेचे असते.

वाहतूक पोलिसांच्या नियोजन विभागाचे निरीक्षक विवेकानंद वाखारे म्हणाले, नवीन प्रणाली राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. काही इच्छुकांनी वाहतूक विभागाला त्याचे सादरीकरण देखील केले आहे. नजीकच्या काळात हॉयड्रॉलिक प्रणालीची वाहने येऊ शकतात.

Web Title:  Hydraulic actions on heavy vehicles, trial by traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.