नियोजनाच्या अभावामुळे वाढतोय बकालपणा

By admin | Published: January 14, 2017 03:48 AM2017-01-14T03:48:55+5:302017-01-14T03:48:55+5:30

जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. जनता वसाहतीमध्ये अद्यापही सांडपाणी

Increasing childhood due to lack of planning | नियोजनाच्या अभावामुळे वाढतोय बकालपणा

नियोजनाच्या अभावामुळे वाढतोय बकालपणा

Next

पुणे : जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. जनता वसाहतीमध्ये अद्यापही सांडपाणी, कचरा, असमान पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपुरी स्वच्छतागृहे अशा विविध समस्या आहेत. तर पूरग्रस्त वसाहत असलेल्या दत्तवाडीमध्ये मालकी हक्क, बांधकामास परवानगी नसणे, नियोजनाच्या अभावामुळे वाढत चाललेला बकालपणा हे प्रश्न उभे आहेत. या प्रभागातील काही भाग सोसायट्यांचा असून, तिथे काही प्रमाणात कचऱ्याची समस्या जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
झोपडपट्टी, पूरग्रस्त वसाहत आणि सोसायट्या अशा तीन वेगवेगळ्या गटांतील नागरिक या प्रभागात आहेत. जनता वसाहत ही शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. हातावर पोट असलेले बहुतेक जण जनता वसाहतीत राहतात. घर बांधण्यापासून इतर सोयी-सुविधा देण्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे नियोजन या भागासाठी करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली कचरा, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, अपुरी स्वच्छतागृहे अशा समस्या आजही कायम आहेत. मुख्य रस्त्यालगत कालवा असून, त्याला सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आलेली नाही. अनेक जण कालव्यातच कचरा टाकताना दिसतात. यामध्ये सुधारणा करण्याची येथील नागरिकांची मागणी आहे.
दत्तवाडीचा बहुतेक भाग या प्रभागात आला आहे. पूरग्रस्त वसाहतीमुळे दत्तवाडीच्या विकासात मर्यादा आहेत. अद्याप अनेकांना घरांचा मालकी हक्क मिळालेला नाही. या भागात नवीन बांधकाम करायचे म्हटले तरी मान्यता मिळत नाही. कुटुंब वाढत चालल्याने नागरिकांनी नाईलाजास्तव घरांचे मजले वाढविले आहेत. कचऱ्याची समस्याही या भागात आहे. दांडेकर पुलालगत असलेल्या झोपडपट्टीतही सुविधांचा अभाव आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रालगत असलेल्या भागात अद्याप सर्व सुविधा नाहीत.
अनधिकृत जाहिरातबाजीचा वेढाही या भागाला पडला आहे. सिंहगड रस्त्यालगत असलेल्या जगदेवनगर, सातववाडी, बाबूराव भाऊराव फुले उद्यान या परिसराचा काही भाग वगळल्यास बहुतेक सोसायट्या आहेत. पण असमान पाणीपुरवठा व कचऱ्याची
समस्था जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावरील सातत्याच्या वाहतूककोंडीवरही या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त
केली. (प्रतिनिधी)

Web Title: Increasing childhood due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.