शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 03:42 AM2017-09-13T03:42:11+5:302017-09-13T03:42:11+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांत शहरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या तापसणीमध्ये तब्बल २१ हजार मिळकतींमध्ये डेंगी डासांची व अळ््यांची उत्पत्ती केंद्रे असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ७०३ मिळकतदारांकडून आतापर्यंत ३ लाख १६ हजार रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.

 Inspection centers of Dengue-mosquitoes, health department survey in 21 thousand income earnings in the city | शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी  

शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी  

Next

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांत शहरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या तापसणीमध्ये तब्बल २१ हजार मिळकतींमध्ये डेंगी डासांची व अळ््यांची उत्पत्ती केंद्रे असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ७०३ मिळकतदारांकडून आतापर्यंत ३ लाख १६ हजार रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत डेंगीचे ४२९, तर चिकुनगुनियाचे ३१७ रुग्ण सापडले आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या आसपास आणि कामाच्या ठिकाणी असलेली डेंगी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने केले आहे.
डेंगी डासांची उत्पत्ती न होऊ देणे हे त्या - त्या ठिकाणांवरील जबाबदार व्यक्तीचे काम आहे. सार्वजनिक असो अथवा खासगी जागा असो तेथे डासोत्पत्ती होत असल्यास स्थानिक क्षेत्रीय कार्यालयातील कीटक प्रतिबंधक विभागातील अधिकाºयांकडून संबंधित जबाबदार व्यक्तीला नोटिसा देण्यात येतात.
जर नोटिसा देऊनही त्यांनी काळजी घेतली नाही, तर त्यांना दंड करण्यात येतो. आतापर्यंत अशा ७०६ मिळकतींकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच खासगी मिळकती (घरे, खासगी जागा, कंपनी, आॅफिसेस) आणि सार्वजनिक ठिकाणी (सरकारी कार्यालये, मैदाने, महापालिकेच्या विविध दवाखाने, उद्याने) मिळून २१ हजारांपेक्षा अधिक मिळकतींच्या इथे डेंगी डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत.
विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणांऐवजी खासगी ठिकाणी डासोत्पत्ती तिप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. खासगीच्या १५ हजार ९१८ ठिकाणी, तर सरकारी ५ हजार ८३८ ठिकाणी डासोत्पत्ती आणि डेंगी डासांच्या अळ््यांची निर्मिती झालेली आहे.

साडेपाच हजार नोटिसा दिल्या
वारंवार डेंगी डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी कीटक प्रतिबंधक विभागाने शहरातील खासगी आणि सार्वजनिक मिळकतींच्या ५ हजार ६१७ मालकांना व जबाबदार व्यक्तींना नोटिसा दिल्या आहेत, तर ९ लाख तीन हजार या खासगी आणि एक लाख ४७ हजार खासगी मिळकतींची अबेटिंग (कीटकनाशक टाकणे) करण्यात आले आहे.

Web Title:  Inspection centers of Dengue-mosquitoes, health department survey in 21 thousand income earnings in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.