भिडेवाडा स्मारकासाठी भूसंपादन करावे

By admin | Published: January 2, 2015 01:02 AM2015-01-02T01:02:59+5:302015-01-02T01:02:59+5:30

क्रांतिज्योती सावित्रीबाई व महात्मा जोतीराव फुले यांनी फातिमाबिबी शेख यांच्या सहकार्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली

Land acquisition for Bhidewada Memorial | भिडेवाडा स्मारकासाठी भूसंपादन करावे

भिडेवाडा स्मारकासाठी भूसंपादन करावे

Next

पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई व महात्मा जोतीराव फुले यांनी फातिमाबिबी शेख यांच्या सहकार्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाड्यात स्मारक उभारण्यासाठी तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी मुलींची १ली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीने आज केली़
समितीच्या वतीने १ जानेवारी हा दिवस ‘स्त्री शिक्षण गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात करण्यात येतो़ आज समितीनेच लावलेल्या १ ल्या शाळेच्या गौरव फलकास सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा साळवे यांनी पुष्पहार अर्पण केला़
या वेळी समितीचे निमंत्रक नितीन पवार, मोलकरीण पंचायतीच्या सरचिटणीस अ‍ॅड़ शारदा वाडेकर, दलित स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख दादासो सोनवणे, बांधकाम मजदूर सभेचे अध्यक्ष मोहन वाडेकर, सुभाष रिठे, माधव घोटमुकले, नकुसा लोखंडे, राजश्री कालेकर आदी उपस्थित होते़
(प्रतिनिधी)

या आहेत विविध मागण्या
जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे पदाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन देऊन शाळेच्या स्मारक उभारणीसाठी तातडीने पावले उचलावीत़ स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक बोलवावी़ भारतातील स्त्रियांचे शिक्षण १ जानेवारीला सुरू झाले, म्हणून हा दिवस स्त्री शिक्षण गौरव दिवस म्हणून शासनाने जाहीर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या़

Web Title: Land acquisition for Bhidewada Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.