पुण्याच्या तापमानाचा सलग सहा दिवस चढला पारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:53 PM2019-04-29T13:53:43+5:302019-04-29T14:02:08+5:30

राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसला जाऊन पोहचले़ पुढील दोन दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे़. 

Last six days Tempreture increased in Pune | पुण्याच्या तापमानाचा सलग सहा दिवस चढला पारा  

पुण्याच्या तापमानाचा सलग सहा दिवस चढला पारा  

Next
ठळक मुद्देआणखी दोन दिवस उष्मा राहणार : @ ४३अंश सेल्सिअस कमाल व किमान तापमान ४२ आणि २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता

पुणे : सलग सहा दिवस पुणेकरांनी चढत्या क्रमांने तापमान वाढीचा अनुभव घेतला असून ही सलग उच्च तापमानवाढीची शिक्षा पुणेकरांना प्रथमच झाली आहे. या तापमानवाढीमुळे पुणेकर हैराण झाले असून, थंडावा मिळण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसून येत आहेत.  
राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसला जाऊन पोहचले़ पुढील दोन दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे़. 
पुणे शहरात २३ एप्रिलपासून कमाल तापमानात दररोज वाढ होत आहे़. २३ एप्रिलला शहरात ४०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़. त्यानंतर २४ एप्रिलला ४१. १, २५ एप्रिलला ४१.६, २६ एप्रिलला ४२.६ आणि २७ एप्रिलला ४२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंद झाली होती़. सलग सहा दिवस तापमान वाढले असले तरी गेल्या तीन दिवसात पाऱ्या
पुणेकरांनी आपल्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस रविवारी अनुभवला़. वाढता उष्मा आणि त्यात रविवारची सुट्टी यामुळे बहुतेकांनी घरीच बसण्याचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येत होते़. शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखे चित्र दिसून येत होते़ रस्त्यावरील सिग्नलला दोन मिनिटही थांबणे असह्य होत होते़. सरबताच्या गाड्या, फळांच्या हातगाड्यांवर घामाघुम झालेल्या नागरिकांची गर्दी दिसून येत होती़. 
कोरडे हवामान, निरभ्र आकाश यामुळे सूर्याची उष्णता थेट जमिनीपर्यंत येत आहे़. त्यात जमिनीतील ओलावा कमी झाल्याने ती लवकर तापते़ हवा एका ठिकाणी साचून रहात असल्याने उकाड्यात वाढ होताना दिसत आहे़. ही परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे़. मात्र, आता कमाल तापमान कमी होत जाईल़. सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़. कमाल व किमान तापमान ४२ आणि २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे़. 

Web Title: Last six days Tempreture increased in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.