Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 01:28 PM2019-10-19T13:28:10+5:302019-10-19T13:51:18+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election : रात्रीपासून भेटीगाठी-मसलतींना वेग

Maharashtra Election 2019 : The promotion campaign of the Assembly election will stop today | Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार

Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार

googlenewsNext
ठळक मुद्देलोकशाहीच्या उत्सवातील जाहीर प्रचाराचा पहिला टप्पा आता संपणार येत्या सोमवारी (दि.२१) सर्व उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार मतदारसंघांत गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या  फैरी आणि आश्वासनांचा पाऊस

पुणे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी (दि.१९) संध्याकाळी सहा वाजता थांबणार आहे. विविध नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, दुचाकी रॅली आदींनी ढवळून निघालेले पुणे शनिवारी रात्रीपासून शांत होणार आहे. त्यानंतर पुढचे ४८ तास भेटीगाठी, गुप्त मसलती, संपर्क यांना जोर चढणार आहे. येत्या सोमवारी (दि.२१) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. 
पुण्यातील कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, कॅन्टोन्मेंट, हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या आठ मतदारसंघांत गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या  फैरी आणि आश्वासनांचा पाऊस पडत होता. दर पाच वर्षांनी येणाऱ्या या लोकशाहीच्या उत्सवातील जाहीर प्रचाराचा पहिला टप्पा आता संपणार आहे. मतदानाच्या दुसºया टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून येत्या सोमवारी (दि.२१) सर्व उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार आहे. 
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. ‘ईव्हीएम’च्या वापरासंबंधीचे तांत्रिक प्रशिक्षण सरकारी कर्मचारी-अधिकाºयांना देण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीही सरकारी पातळीवरून तसेच विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मतदानासाठी केवळ ४८ तास उरले असल्याने सर्व यंत्रणा मतदान केंद्रावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. 
राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी उरलेले ४८ तास महत्त्वाचे असणार आहेत. मतदारांना मतदान चिठ्ठ्या पोहोचवण्याचे काम अनेक उमेदवारांनी पूर्ण केले आहे. उरलेल्या काही तासांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि बुथ यंत्रणा कामाला लावण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. 
.....
४प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांनी जाहीर सभांवर जोर न देता मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. प्रचारफेºया, दुचाकी रॅलीचे आयोजन उमेदवारांनी केले आहे. 
........
आरोप-प्रत्यारोपांनी ढवळले शहर
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार आहेत. भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीच्या वतीने २०१९ च्या निवडणुकीतही या आठही मतदारसंघात भाजपचेच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षांचे आव्हान आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपच्या विद्यमान आमदारांना विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात आले होते. त्याला तितकेच जोरदार प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले. यातल्या कोणाचा प्रभाव मतदारराजावर पडला, याचे उत्तर सोमवारी ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
.........
राज्य-राष्ट्रीय नेत्यांची प्रचारासाठी हजेरी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, रामदास आठवले, गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, लडाखचे खासदार जम्यांग नामग्याल यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांनी भाजपसाठी मते मागितली. तुलनेने काँग्रेसचा प्रचार अत्यंत स्थानिक पातळीवरचा राहिला. राष्ट्रीय नेत्याकरिता लेतप्लँग, काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद, तेलंगणाचे खासदार रेवंश रेड्डी यांच्या व्यतिरीक्त काँग्रेसच्या प्रचारात फार कोणी सहभागी झालेले दिसले नाही. ‘राष्ट्रवादी’कडून अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचार केला. मात्र, राज्यभर दौरे करणाºया शरद पवारांनी पुण्यात यंदा सभा घेतली नाही. विरोधी पक्षाच्या प्रचारांची उणीव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सभांनी भरून काढली.

Web Title: Maharashtra Election 2019 : The promotion campaign of the Assembly election will stop today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.