महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये पुणे केंद्रातून 'आकार' प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 10:25 AM2017-11-30T10:25:01+5:302017-11-30T10:25:09+5:30
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून आगम या संस्थेच्या आकार या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाट्यमंडळ या संस्थेच्या कुलकर्णी आणि कंपनी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली.
पुणे - ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून आगम या संस्थेच्या आकार या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाट्यमंडळ या संस्थेच्या कुलकर्णी आणि कंपनी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. रंगशीला या संस्थेच्या पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दिगदर्शनासाठी प्रथम क्रमांक प्रियांका चांदेरे (आकार) यांना मिळाला आहे तर द्वितीय क्रमांक संतोष माकुडे (पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त) यांना जाहीर झाला आहे.
प्रकाश योजनेसाठी वैभव नेवसकर (आकार) यांना प्रथन क्रमाकं तर सुबोध राजगुरू (मुंबई मान्सून) साठी द्वितिय क्रमांक मिळाला आहे. नेपथ्यासाठी प्रथम क्रमांक अश्विनी करंदीकर (आकार), द्वितीय क्रमांक अजिंक्य गोखले (कुलकर्णी आणि कंपनी) यांना मिळाला आहे. रंगभूषेसाठी प्रथम क्रमांक वृषाली वडनेरकर (शामपट) यांना तर द्वितीय क्रमांक नरेंद्र वीर (येऱ्या गबाळ्याचे काम नोहे) यांना मिळाला आहे.
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक जयदीप मुजुमदार (मुंबई मान्सून), जान्हवी देशपांडे (आया सावन झूम के) यांना जाहीर झालं.
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : उन्नती कांबळे (येऱ्या गबाळ्याचे काम नोहे), रश्मी देव (शामपट), मुक्ता लेले (मुंबई मान्सून), श्रेया गोफणे (आती रहेगी बहारे), अभिजित केळकर (आकार), संकेत जोशी (कुलकर्णी अँड कंपनी), चिन्मय संत (पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त) यांना जाहीर करण्यात आली आहेत.
६ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विष्णू पुरीकर, राजेंद्र जोशी आणि मालती भोंडे यांनी काम पाहिले.