नवरदेव हत्तीवर तर वऱ्हाडी घोडे अन् उंटावर; पुण्यातील अनोखा विवाहसोहळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:34 PM2017-12-11T17:34:38+5:302017-12-11T17:45:48+5:30
लग्नाचे इतर खर्च टाळुन आपल्या मुलांची वरात राजा-महाराजा प्रमाणे काढण्याचा निर्धार बाळासाहेब धोका यांनी केला होता..
बिबवेवाडी : कोर्ट मॅरेजच्या जमान्यातदेखील राजे महाराजांप्रमाणे लग्नाची हौस करणारे अनेक जण आहेत. असेच एक लग्न झाले आहे पुण्यात...
आपल्या मुलाची वरात राजा-महाराजा प्रमाणे आणणार हे स्वप्न होते, दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धोका यांचे.. लग्नाचे इतर खर्च टाळुन आपल्या मुलांची वरात राजा-महाराजा प्रमाणे काढण्याचा निर्धार त्यांनी केला होता.. ऐतिहासिक सिनेमा पाहताना त्यांच्या मनात हा विचार आला होता. आपल्या पत्नीला त्यांनी याबाबत सांगितले होते, की मुलाची वरात आपण वेगळ्या पद्धतीने काढू. त्या नुसार आज त्यांनी आपल्या मुलाची वरात हत्तीवरून काढली. सर्व वऱ्हाडी मंडळी घोड्यावर व धोका परिवाराचे सर्व जावई उंटावर बसवले होते. प्रत्येकाला महाराष्ट्राची शान पांढरी टोपी घालण्यात आली होती. तर सर्व महिला महाराष्ट्रीय साडी घालून या लग्नात सहभागी झाल्या होत्या.