पाकव्याप्त काश्मीरमधील बांधकामे चुकीची, चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:16 AM2017-09-16T03:16:10+5:302017-09-16T03:16:20+5:30
चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत.
पुणे : चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी, पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फाउंडेशन, द ट्रिब्यून ट्रस्ट, आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज अर्थात सीएएसएस या संस्थांतर्फे आयोजित ‘पुणे डायलॉग आॅन नॅशनल सिक्युरिटी-२०१७’ (पीडीएनएस) या सुरक्षाविषयक तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन यशदा येथे करण्यात आले होते. या परिषदेस चीन येथील फुदान विद्यापीठातील ‘इस्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल अफेअर्स’ विभागाचे प्रमुख प्रा. शेन डिंगली यांंनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
डिंगली म्हणाले, चीन पाकव्याप्त काश्मीरच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम केले जात आहे. वास्तविक पाहता या जागा वादातीत आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा जागेत काम करणे चुकीचे आहे. मात्र, तरीसुद्धा या ठिकाणी कामे होत आहेत. इंडो पॅसिफिक योजनेद्वारे चीनला शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पाहता योजनेद्वारे चीनला काही फरक पडणार नाही.
आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, त्याचबरोबर डोकलामबाबत भूतान व चीनमध्ये पूर्वीपासून वाद आहे. अशा परिस्थितीत चीनने तिथे रस्त्याचे काम करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीनचा नॉर्थ कोरियाच्या भूमिकेला विरोध आहे. याबाबत वेळोवेळी चीनने त्या देशाला समज दिली आहे. नॉर्थ कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याने आशिया खंडातील परिस्थिती अस्थिर बनली आहे.
- प्रा. शेन डिंगली