उच्च दाबाची विजेची तार बुलेटवर पडल्याने आई व मुलगा भाजून जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:27 PM2018-05-19T20:27:23+5:302018-05-19T20:27:23+5:30

बुलेटवरून जात असताना विजेची तार पडून तिघा जणांना अपघात घडला. यात एक जण गंभीर भाजला आहे.

Mother and son injured due to high electric wire falling on bullet | उच्च दाबाची विजेची तार बुलेटवर पडल्याने आई व मुलगा भाजून जखमी 

उच्च दाबाची विजेची तार बुलेटवर पडल्याने आई व मुलगा भाजून जखमी 

Next
ठळक मुद्देमुलाची प्रकृती चिंताजनक, रोहकल येथील घटना....देवासारखा धावून आला देवा अन वाचवले माय लेकाचे प्राण....उच्च दाबाची विजेची तार अचानक तुटून बुलेटवर पडून तीन जण गंभीर भाजले

चाकण : वेळ दुपारी तीनची...विशाल आपल्या आईसह बुलेटवरून शेताकडे जात होता... शेतात पिकाला पाणी द्यायला जात असताना अचानक उच्च वाहिनी विजेची तार तुटली... ती अचानक बुलेटवर पडली....यावेळी त्यांचा क्रेनवरील वरील ड्रायव्हर परमेश्वर उर्फ देवा हा देवासारखा धावून आला... अन आपल्या मालकाच्या दुचाकीवर पडलेली तार धोका पत्करून हाताला स्कार्फ गुंडाळून अक्षरश: हाताने बाजूला फेकली...अन मालकाचे प्राण वाचविले....तरीसुध्दा विशाल या अपघातात गंभीर भाजला... ही घटना रोहकल ( ता.खेड ) येथे घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी( दि. १९ ) दुपारी ३ वाजता घडली. या घटनेत विशाल दशरथ काचोळे ( वय २६, रा. रोहकल, ता.खेड, जि.पुणे ) हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यात विशालची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याचे वडील माजी सरपंच दशरथ काचोळे यांनी सांगितले. विशालची आई विमल दशरथ काचोळे ( वय ४२, रा. रोहकल ) व परमेश्वर लक्ष्मण हराळे ( वय २८, रा. रोहकल, मुळगाव राजपिंपळे, ता.गेवराई, जि.बीड ) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी परमेश्वर हराळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उच्च दाबाची विजेची तार अचानक तुटून बुलेटवर पडून तीन जण गंभीर भाजले आहे. त्यामध्ये एक जण गंभीर व दोन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार एस. आर. हरगुडे यांनी दिली. घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आली असून वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज पुरवठा खंडित करून विजेची तार जोडण्याचे काम सुरु केले आहे. 
==================================

Web Title: Mother and son injured due to high electric wire falling on bullet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.