नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:53 AM2024-05-09T11:53:10+5:302024-05-09T11:53:20+5:30

कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दिली...

MPs don't get time due to drama cinema shooting; Ajit Pawar's fox gang | नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला

नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला

लोणी काळभोर (पुणे) :शिरूर लोकसभेतून गेल्या वेळेस निवडून आलेल्या खासदाराला मतदारसंघात फिरायला वेळच मिळाला नाही कारण त्यांच्यामागे नाटक, कार्यक्रमाच्या शूटिंगची कामे असतात. मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न व विकासकामांसाठी त्यांना वेळ देता आला नाही. तर, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक हरल्यानंतर देखील मतदारसंघात संपर्क ठेवला असून त्यांना निवडून दिल्यावर केंद्रातील व राज्यातील देखील भरघोस निधी मिळेल व आपल्या परिसरात मोठमोठी विकासकामे होतील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली.

कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दिली. यावेळी लोणी काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक, बूथ कमिटी सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणले, जो माणूस खिशात असलेले पैसे खर्च करू शकत नाही तो केंद्रातले पैसे कसे आणू शकेल, त्यामुळे आपल्याला अधिक विकासकामे करण्याकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्यावे. पंधरा वर्षे मी खासदार असताना, ड्रीम प्रकल्प केले होते, पुणे नाशिक हायवे याचा मार्गसुद्धा मीच निर्माण केला होता. त्यासोबत लोणी काळभोर येथील सोळाशे कोटींचा पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

Web Title: MPs don't get time due to drama cinema shooting; Ajit Pawar's fox gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.