नीरा-भीमा प्रकल्प दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:24 PM2017-11-22T13:24:24+5:302017-11-22T13:30:17+5:30

इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थितीकरण नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु असताना घडलेल्या अपघातात ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने आज सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Neera-Bhima project disaster case filed against four employees of the company | नीरा-भीमा प्रकल्प दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नीरा-भीमा प्रकल्प दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देअपघातानंतर तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात काम सुरु असताना अधिकाऱ्यांनी पुरविली नाहीत बोगद्यामध्ये सुरक्षेची साधने

अकोले : इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थितीकरण नदीजोड प्रकल्पाच्या पाच नंबर बोगद्याचे काम सुरु असताना घडलेल्या अपघातात वायरोप तुटून ७० मीटर खोल बोगद्यात ट्रॉली कोसळल्याने ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने आज सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 
कंपनीचे सुरक्षा अधिकारी रामबहादूर रामा असरेपाल (रा. उत्तरप्रदेश), मेकॅनिकल इंजिनीअर नविनकुमार रविदत्ता शर्मा (मरेपुरा ता. कडूमर-अलवर राजस्थान), मॅनेजर मुरलीकृष्णा शिवाजीराव मेहरदरा मेटला नेडमानुररू जि. कृष्णा, आंध्रप्रदेश आणि श्रीधर वालेश्वरराव वेजंडला, पालवणचा तेलंगणा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 
बोगद्यामध्ये काम सुरु असताना अधिकाऱ्यांनी बोगद्यामध्ये सुरक्षेची साधने तसेच पुरेशी सुरक्षित साहित्य पुरविली नाहीत. त्याचप्रमाणे वापरण्यात आलेली क्रेन व इतर मशिनरी नादुरुस्त असताना देखील क्रेनमधील कामगारांच्या जीवितास धोका झाल्याने भारतीय दंड संहिता कलम ३०४ (२) ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यास विलंब केलेल्या भिगवण पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अधिकारी आणि मालकांना मात्र मोकळीक दिल्याने इंदापुर तालुक्यातील जनता संतप्त झाली असुन खऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन करणार असल्याचे व काम चालू होवू देणार नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

Web Title: Neera-Bhima project disaster case filed against four employees of the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे