नीरा नदीचे पात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:19 AM2018-03-13T01:19:59+5:302018-03-13T01:19:59+5:30
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर दगडवाडी, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी येथील नीरा नदीचे पात्र पाण्यावाचून कोरडे पडले आहे.
निरवांगी : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर दगडवाडी, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी येथील नीरा नदीचे पात्र पाण्यावाचून कोरडे पडले आहे. यामुळे या भागातील शेतातील पिके धोक्यात आली आहेत. या नदीच्या पात्रात दि.१९ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे. अन्यथा २० मार्चला निरवांगी येथे बीकेबीएन या रस्त्यावर निरवांगीच्या मुख्य चौकात ‘रस्ता रोको’ करण्याचा निर्णय निरवांगी येथे शेतकºयांनी बैठक घेऊन घेतला. निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी ही सर्व गावे नीरा नदीच्या पात्रालगत आहेत. या गावातील मोठ्या प्रमाणात शेतकºयांची शेती ही नीरा नदीच्या पात्रातील पाण्यावर अवलंबून आहे. परंतु नदीपात्र पाण्यावाचून कोरडे पडले आहे. यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली परिसरातील शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. या भागातील शेतकºयांनी शेतीच्या पिकासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. परंतु नदीच्या पात्रात पाणी नसल्याने सदर पिकांना पाणी द्यायचे कोठून, असा प्रश्न पडलेला आहे. यामुळे या नदीच्या पात्रात (दि.१९) मार्च पर्यंत पाणी सोडण्यात यावे. अन्यथा (दि. २०) मार्च ला निरवांगी या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय शेतकºयांनी निरवांगी येथे बैठकीत घेतला.
या बैठकीत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होती .
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, खोरोची बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी व परिसरातील निरा नदीच्या पात्रालगतची गावे तर माळशिरस तालुक्यातील बांगडे व पळसमंडळ व परिसरातील निरा नदीचा किनारी असलेल्या गावातील शेती ही मोठ्या प्रमाणात निरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु, सध्या नदी पात्रात पाणी नाही. नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदी पात्रात पाणी न सोडल्यास ‘रस्ता रोको’ शेतकरी करतील, असा निरवांगी येथे शेतकºयांनी बैठक घेऊन निर्णय घेतला.