वडगावशेरी श्रावक संघात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नवीन वर्षाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:11 PM2018-01-02T13:11:55+5:302018-01-02T13:15:00+5:30

वाणीभूषण प. पू. प्रीतीसुधाजी म. सा. यांच्या सान्निध्यात वडगावशेरी श्रावकसंघाच्या वतीने नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.

New year starts with the oath of de-addiction in the Wadgaon sheri Shravak Sangh | वडगावशेरी श्रावक संघात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नवीन वर्षाची सुरुवात

वडगावशेरी श्रावक संघात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नवीन वर्षाची सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देया उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व आपला देश निर्व्यसनी बनवावा : विजय छाजेडप्रीतीसुधाजी म. सा. यांनी आपल्या व्याख्यानामधून व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली

बिबवेवाडी : वाणीभूषण प. पू. प्रीतीसुधाजी म. सा. यांच्या सान्निध्यात वडगावशेरी श्रावकसंघाच्या वतीने नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.
नवीन वर्षाच्या शुभारंभा निमित्त प. पू. वाणीभूषण प्रीतीसुधाजी म. सा. यांनी आपल्या व्याख्यानामधून व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली. वडगावशेरी श्रावक संघाचे अध्यक्ष विजय छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यामध्ये युवकांचा सहभाग मोठा होता. 
विजय छाजेड यांनी सांगितले, की प. पू. म. सा. यांच्या वाणीमध्ये नक्कीच जादू आहे. कारण त्यांनी सांगितलेले प्रत्येक मार्गदर्शन समाजहिताचे असते. सध्याची युवा पिढी झपाट्याने व्यसनाधीन होत चालली आहे. आपला देश व्यसनाधीन युवा पिढीच्या हाती द्यायचा की निर्व्यसनी युवा पिढीच्या हाती द्यायचा याचा विचार आपण केला पाहिजे. त्यासाठीच आम्ही हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या अभिनव उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व आपला देश आपला समाज निर्व्यसनी बनवावा.
यावेळी या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष विजय छाजेड, किरण बोरा, आशीष बोरा, सुरेश डाकलिया, चंद्रकांत पगारिया, अशोक बोरा, सुमीत बाबेल, राजेंद्र छोरीया यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: New year starts with the oath of de-addiction in the Wadgaon sheri Shravak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.