रिटायर्ड नव्हे, मी बिझी पर्सन - अनुपम खेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:12 AM2017-10-18T03:12:27+5:302017-10-18T03:13:54+5:30

निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही, म्हणून अनेक जण काम करतो, असे सांगतात. पण वेळ घालवण्यासाठी काम केले जात नाही. ‘आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन, आय एम अ व्हेरी अ‍ॅक्टिव्ह पर्सन...’ अशा शब्दांत

 Not retired, I am busy - Anupam Kher | रिटायर्ड नव्हे, मी बिझी पर्सन - अनुपम खेर

रिटायर्ड नव्हे, मी बिझी पर्सन - अनुपम खेर

Next

पुणे : निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही, म्हणून अनेक जण काम करतो, असे सांगतात. पण वेळ घालवण्यासाठी काम केले जात नाही. ‘आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन, आय एम अ व्हेरी अ‍ॅक्टिव्ह पर्सन...’ अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपम खेर यांनी एफटीआयआयमध्ये कायमच सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले.
एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अनुपम खेर यांनी अचानक संस्थेत ‘एंट्री’ करून प्रशासनासह विद्यार्थ्यांना धक्का दिला. मात्र एक दिवसापुरतेच न थांबता मंगळवारी (दि. १७) त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मास्टर क्लास’ घेतला.
या अनुभवाविषयी ते म्हणाले, की चंदीगढ डिपार्टमेंट इंडियन थिएटरसारख्या संस्थेमधून जे काही शिकलो नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एफटीआयआयमध्ये काही काळ घालविला.
शिक्षण घेतल्यानंतरही सहा महिने काम मिळविण्यासाठी रस्त्यावर भटकत होतो. आपल्याला काम मागणे किती गरजेचे आहे, त्यासाठी संघर्ष कसा करायचा, हे सांगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो. जीवनात जो काही अनुभव घेतला जे शिकलो ते आज शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना सांगताना नक्कीच आनंद होत आहे.
आजवरचे जे अध्यक्ष झाले त्यांना संस्थेसाठी म्हणावा तेवढा वेळ देणे शक्य झाले नाही. तुम्ही कसा वेळ काढणार आहात? याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की मास्टर क्लास के बाद मैं आप से बातचीत कर रहा हूँ ना! आजोबा नेहमी म्हणायचे, व्यस्त असलेल्या माणसाकडेच कामासाठी नेहमी वेळ असतो. एखाद्या माणसाला काहीतरी करायची इच्छा असेल, तर तो काम शोधून काढतोच. मी ३३ वर्षांत ५८८ चित्रपट केले आहेत. देशविदेशात काम केले आहे. अध्यक्षपदी काम करताना मला विद्यार्थ्यांच्या थोडीच डोक्यावर बसायचे आहे. बाहेरच्या देशामधून मी जे काही शिकेन त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनाच होईल. आजकालच्या मुलांना पालक थोडीच शेजारी बसून हे करा, हे करू नका सांगतात.

‘मास्टर क्लास’वर बहिष्कार
एफटीआयआय प्रशासनाकडून अभ्यासक्रमांमधील जाचक नियमांच्या विरोधात २०१६ च्या बॅचमधील काही विद्यार्थ्यांनी ‘व्हिसडमट्री’ येथे बॅनर लावून आंदोलन सुरू केले आहे. पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रशासनाकडे विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचा पाढा वाचला आहे. मात्र प्रशासन ढीम्मच आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना ‘मास्टर क्लास’ला बसण्यासाठी विचारले असता विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यावर भाष्य करताना रंगमंचावर काम करताना समोर काही जागा रिकाम्या दिसतात. पण हे विद्यार्थी माझे आहेत, असे मी समजतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्याचा नक्की प्रयत्न करेन, असे खेर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांबरोबर प्रशासनाने चर्चा केली आहे. त्यांच्या काही मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. अनुपम खेर यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एक मीटिंग झाली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हीही आशावादी आहोत.
- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय

Web Title:  Not retired, I am busy - Anupam Kher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.