पीएमपीएमएल प्रशासनाची बेफिकिरी...! सीएनजी गॅस गळतीमुळे बस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:08 IST2017-11-27T15:57:40+5:302017-11-27T16:08:17+5:30
दिवे घाटात पीएमपीएमएलची भाडेतत्वावरील महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसला सीएनजी गॅस गळतीमुळे आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

पीएमपीएमएल प्रशासनाची बेफिकिरी...! सीएनजी गॅस गळतीमुळे बस जळून खाक
सासवड : दिवे घाटात पीएमपीएमएलची भाडेतत्वावरील महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एमएच १४ सीडब्ल्यू २०३१ (मार्ग क्र. २०८-९) आर नं. २२० बसला सीएनजी गॅस गळतीमुळे आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. या बसमध्ये ५५ प्रवासी प्रवास करत होते. ही जादा बस हडपसरहून सासवडकडे निघाली होती. दुपारी एकच्या सुमारास दिवे घाटात बसच्या इंजिनचा भाग गरम झाल्याने आग लागली. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना कळताच सासवड नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली गेली. या प्रकरणावरून प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. तब्बल दोन तास प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध होवू शकली नाही.