पीएमआरडीए ची मेट्रो उशिरा धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 08:07 PM2018-03-05T20:07:35+5:302018-03-05T20:07:35+5:30

पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र शासनाकडून आत्तापर्यंत सातवेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून सुमारे तेराशे कोटी रुपयांचा निधी मिळावा या उद्देशाने पीएमआरडीए कडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र,त्यास यश मिळत नसल्याने पीएमआरडीएची मेट्रो धावण्यास विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

PMRDA's metro will run late | पीएमआरडीए ची मेट्रो उशिरा धावणार 

पीएमआरडीए ची मेट्रो उशिरा धावणार 

Next
ठळक मुद्दे पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविला जाणार आहे.पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते येत्या ७ मार्च रोजी स्वत: दिल्ली येथे केंद्रीय समितीशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे

पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र शासनाकडून आत्तापर्यंत सातवेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून सुमारे तेराशे कोटी रुपयांचा निधी मिळावा या उद्देशाने पीएमआरडीए कडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र,त्यास यश मिळत नसल्याने पीएमआरडीएची मेट्रो धावण्यास विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे व पिंपरी चिचवड परिसरातील नागरिकांना सार्वजनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून मंजूरी मिळाली मिळाली आहे. पीएमएमआरडीए मेट्रो प्रकल्प पब्लिक प्राव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार आहे. मात्र, मेट्रोसाठी केंद्र शासनाकडून सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये मिळविण्यासाठी पीएमआरडीएकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, केंद्राच्या समितीकडून त्यात सातवेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. केंद्राकडून दाखविलेल्या त्रुटींचे वेळोवेळी समाधानकारक उत्तरे देवूनही केंद्रीय समितीचे समाधान होत नाही.पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यासाठी येत्या ७ मार्च रोजी स्वत: दिल्ली येथे केंद्रीय समितीशी चर्चा करण्यासाठी जाणार आहेत.त्यामुळे पीएमआरडीएची मेट्रो अजूनही अधांतरीच आहे.
किरण गित्ते म्हणाले, दिल्लीसह देशभरात मेंट्रो प्रकल्प कार्यान्वित करताना आलेल्या अडचणींची पुनरावृत्ती होऊ नये,याची काळजी केंद्र शासनाकडून घेतली जात आहे. पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविला जाणार आहे.तब्बल आठ वर्षानंतर देशात प्रथमच पीपीपी तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प सुरू केला जाणार आहे.त्यामुळे भविष्यात येणा-या सर्व अडचणींचे समाधान करक उत्तरे केंद्राकडून मागितले जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळावा यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच खासगी स्तरातून निधी उभारण्याचा मार्गाचाही विचार केला जात आहे.मेट्रो प्रकल्पासाठी तीन कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत.
-----------------
देशात 26 मेट्रो प्रकल्प सुरू झाले असून पीपीपी तत्त्वावर मेट्रो प्रकल्प सुरू करणे आव्हानात्मक आहे.मेट्रो भोवती 8 हजार कोटींची संपत्ती उभे राहणे अपेक्षित आहे.त्यामुळे प्रस्तावित मेट्रो स्टेशन परिसरातील जागा व्यावसायिक वापरासाठी दिली जाणार आहे.केंद्र शासनाला बरोबर घेवून मेट्रो प्रकल्प सुरू करणे सर्वांच्या हिताचे असल्याने पीएमआरडीएकडून केंद्राकडे निधीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- किरण गित्ते,महानगर आयुक्त,पीएमआरडीए 

Web Title: PMRDA's metro will run late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.