शासनाकडून ‘पीएमपी’ची ससेहोलपट; सततच्या बदल्यांमुळे चाके येईनात मार्गावर, प्रवाशांचे होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:51 AM2018-02-14T05:51:54+5:302018-02-14T05:52:07+5:30

शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सांभाळणा-या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची राज्य शासनाकडून स्थापनेपासून ससेहोलपट करण्यात आली आहे. मागील दहा वर्षात एक अपवाद वगळता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून एकाही अधिका-याला तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेला नाही.

PM's 'PMP'; Due to continuous transfers, the wheels will be on the way, the passengers are in the halls | शासनाकडून ‘पीएमपी’ची ससेहोलपट; सततच्या बदल्यांमुळे चाके येईनात मार्गावर, प्रवाशांचे होताहेत हाल

शासनाकडून ‘पीएमपी’ची ससेहोलपट; सततच्या बदल्यांमुळे चाके येईनात मार्गावर, प्रवाशांचे होताहेत हाल

Next

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सांभाळणाºया पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची राज्य शासनाकडून स्थापनेपासून ससेहोलपट करण्यात आली आहे. मागील दहा वर्षात एक अपवाद वगळता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून एकाही अधिका-याला तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेला नाही. आतापर्यंत पंधरा अधिकाºयांकडे पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली. सतत बदलणाºया अधिकाºयांमुळे ‘पीएमपी’ मार्गावर आली नाही.
कोणतीही संस्था किंवा कंपनीचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी प्रमुखावर असते. प्रमुखाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिबिंब कामकाजात दिसते. त्यानुसार संस्थेची वाटचाल होते. त्यामध्ये सातत्य राहते. पण पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक बससेवा पुरविणाºया ‘पीएमपी’चे प्रमुख म्हणजे अध्यक्ष सातत्याने बदलत राहिले.
‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्यासाठी पुणेकरांकडून सातत्याने पुर्णवेळ आयएएस अधिकारी देण्याची मागणी केली जाते. मात्र, काही महिन्यांपुरते अधिकाºयांची नियुक्ती करण्याची परंपरा आघाडी सरकारनंतर युती सरकारनेही कायम ठेवली. ‘पीएमपी’चे पहिले अध्यक्ष म्हणून सुब्बराव पाटील यांनी दि. २६ आॅगस्ट रोजी जबाबदारी स्वीकारली. त्यांना केवळ पंधरा महिन्यांचा काळ मिळाला. त्यांच्यानंतर आलेले अश्विनीकुमार केवळ तीन महिनेच राहिले. त्यानंतर नितीन खाडे यांना सुमारे सहा महिनांचा काळ मिळाला. खाडे यांच्यानंतर आॅगस्ट २००९ ते ३ जानेवारी २०११ या सुमारे दीड वर्षांच्या काळात महेश झगडे, शिरीष कारले आणि दिलीप बंड यांच्याकडे ‘पीएमपी’चा अतिरिक्त पदभार राहिला. केवळ आर. एन. जोशी (दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४) यांनीच तीन वर्ष पीएमपीचा गाडा हाकला. त्यानंतर पुन्हा जून २०१५ पर्यंत आठ महिने श्रीकर परदेशी, ओमप्रकाश बकोरिया आणि कुणाल कुमार यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. अभिषेक कृष्णा यांच्या रुपाने पुन्हा जून २०१५ मध्ये पीएमपीला पुर्णवेळ अधिकारी मिळाला. पण तेही केवळ वर्षभरच राहिले. पुन्हा आठ महिन्यांसाठी कुणालकुमार आले. त्यानंतर आलेल्या तुकाराम मुंढे यांनाही केवळ १० महिने मिळाले. आता पीएमपीच्या पंधराव्या अध्यक्षा म्हणून नयना गुंडे यांच्या पदभार स्वीकारला आहे.


श्रीकर परदेशी, तुकाराम मुंडेंनाही अल्पकाळ संधी
दहा वर्षांच्या काळात बदललेल्या पंधरा अधिकाºयांपैकी ‘पीएमपी’ला केवळ सात अधिकारी पुर्णवेळ मिळाले. इतर आठही अधिकाºयांकडे ‘पीएमपी’ अतिरिक्त भार देण्यात आला होता. पुर्णवेळ अधिकाºयांमध्येही सर्वाधिक सुमारे तीन वर्ष आर.एन.जोशी राहिले. तर पाटील व कृष्णा यांनाच किमान वर्षभर काम करता आले.
त्यामुळे जवळपास चार वर्ष ‘पीएमपी’चा कार्यभार ‘अतिरिक्त’ अधिकाºयांच्या खांद्यावर राहिला. अधिकारी बदलत
गेले, मात्र पीएमपीची स्थिती जैसे थे राहिली. परदेशी, मुंढे यांनी विविध
सुधारणा करण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, शासनाने त्यांनाही फार काळ संधी दिली नाही.
2007मध्ये ‘पीएमपी’ अस्तित्वात आल्यापासून ते आजअखेरपर्यंत तब्बल १५ अधिकारी आले. त्यामुळे कंपनीच्या कामात कधीच सातत्य पाहायला मिळाले नाही. उलट सातत्याने बदलणाºया अधिकाºयांमुळे कंपनीच्या तोट्यात भरच पडत गेली. अपुºया बस, सोयी-सुविधा, प्रवाशांची घटती संख्या, अधिकारी व कर्मचाºयांची मनमानी यामुळे पीएमपी खिळखिळी झाली.

२००७ पासूनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
अधिकारी कार्यकाळ
१) सुब्बराव पाटील दि. २६ आॅगस्ट २००७ ते ५ नोव्हेंबर २००८
२) अश्विनीकुमार दि. ५ नोव्हेंबर २००८ ते ८ फेब्रुवारी २००९
३) नितीन खाडे दि. ९ फेब्रुवारी २००९ ते २४ आॅगस्ट २००९
४) महेश झगडे (अतिरिक्त पदभार) दि. २५ आॅगस्ट २००९ ते ७ सप्टेंबर २००९
५) शिरीष कारले (अतिरिक्त पदभार) दि. ७ सप्टेंबर २००९ ते २३ फेब्रुवारी २०१०
६) दिलीप बंड (अतिरिक्त पदभार) दि. २३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११
७) आर. एन. जोशी दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४
८) आर. आर. जाधव (अतिरिक्त पदभार) दि. १ नोव्हेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४
९) श्रीकर परदेशी (अतिरिक्त पदभार) दि. १२ डिसेंबर २०१४ ते ७ एप्रिल २०१५
१०) ओमप्रकाश बकोरिया (अतिरिक्त पदभार) दि. ७ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५
११) कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार) दि. ३० मे २०१५ ते ६ जून २०१५
१२) अभिषेक कृष्णा दि. ८ जून २०१५ ते ८ जुलै २०१६
१३) कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार) दि. ८ जुलै २०१६ ते २९ मार्च २०१७
१४) तुकाराम मुंढे दि. २९ मार्च २०१७ ते ८ फेबु्रवारी २०१८
१५) नयना गुंडे दि. १२ फेब्रुवारी २०१८

Web Title: PM's 'PMP'; Due to continuous transfers, the wheels will be on the way, the passengers are in the halls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.