पुणे महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातर्फे १२,९०७ बालकांना पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:24 PM2018-01-29T13:24:19+5:302018-01-29T13:27:03+5:30
पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातर्फे १२,९०७ बालकांना डोस पाजण्यात आला. मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओ डोस देण्याचे आले.
पुणे : पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातर्फे १२,९०७ बालकांना डोस पाजण्यात आला.
या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओ डोस देण्याचे आले. याकरिता ढोले पाटील सहायक आयुक्त कार्यालयांतर्गत एकूण ७८ बुथ करण्यात आले होते. तसेच ट्रान्झिट व मोबाईल टीमही पोलिओ डोस देण्याकरिता तयार करण्यात आल्या होत्या. या मोहिमेत विशेषत: रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅँड, बसस्टॉप अशा वर्दळीच्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन लहान बालकांना पोलिओ डोस दिले गेले. याचप्रमाणे सिग्नलच्या ठिकाणी असणारी लहान मुले तसेच वाड्यावस्ती, बांधकाम ठिकाणे येथील बालकांनाही विशेष प्रयत्न करून पोलिओ डोस देण्याचे काम करण्यात आले.
या मोहिमेत पुणे महानगरपालिकेची विविध रुग्णालये, कवडे पाटील दवाखाना, कोरेगाव पार्क, दादासाहेब गायकवाड दवाखाना, बारणे रोड, नायडू सांसर्गिक रुग्णालय, सखाराम कुंडलिक कोद्रे दवाखाना मुंढवा याचप्रमाणे ससून सर्वोपचार रुग्णालय व के. ई.एम. हॉस्पिटल येथेही पोलिओ बूथ ठेवण्यात आले होते. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा सुलाखे, डॉ. स्वाती माळी, डॉ. सुप्रिया बिरादार, डॉ. पूनम कदम यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
रविवारी पार पडलेल्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी स्वरुपवर्धिनी कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे नर्सिंग विद्यार्थी, रोटरी क्लब आॅफ एअरपोर्टच्या सदस्या आरती संघवी यांनी स्वयंसेवकांना फुड्स पॅकेट देण्यात आले व के. ई. एम. रुग्णालय, अंगणवाडी सेविका यांनी विशेष सहकार्य केले.
पुणे पालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे, लसीकरण अधिकारी डॉ. आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जगदाळे व सहकारी टीम, शैलेश चव्हाण, कृष्णा कसबे यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.