राज्यात शिक्षक बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:14 AM2018-04-16T02:14:59+5:302018-04-16T02:14:59+5:30
राज्यभरातील शिक्षक बदल्यांची मागील वर्षी रद्द केलेली बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सर्वसमावेशक बदल्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा वाद पुन्हा पेटला आहे. प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. या मोर्चामुळे शिक्षक ऐन उन्हाळी सुटीत रस्त्यावर उतरणार आहेत.
बारामती - राज्यभरातील शिक्षक बदल्यांची मागील वर्षी रद्द केलेली बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सर्वसमावेशक बदल्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा वाद पुन्हा पेटला आहे. प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. या मोर्चामुळे शिक्षक ऐन उन्हाळी सुटीत रस्त्यावर उतरणार आहेत.
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बदली धोरणावर चर्चा करण्यासाठी तालुकाध्यक्षांची सभा पुणे येथील शरदचंद्रजी पवार शैक्षणिक संकुलात आयोजिण्यात आली होती. मागील वर्षभर शिक्षक बदल्यांविषयी शासन व संघटना यांमध्ये बदल्यांवरून वाद सुरू होता. वर्षभर न्यायालयीन याचिका व शिक्षकांची आंदोलने यामुळे शासनास ऐनवेळी बदल्या रद्द करण्याची वेळ आली होती. मात्र, त्यानंतरही शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, की मागील वर्षी फेब्रुवारी २०१७ मध्ये शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. उन्हाळी सुटीसह दिवाळीची सुटी संपली. डिसेंबर २०१७ पर्यंत बदल्यांचा गोंधळ सुरूच होता. मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ या ठिकाणी बदल्यासंदर्भात याचिकावर सुनावणी सुरू होती. न्यायालयीन प्रक्रियेत शासनाने बाजी मारली. राज्य सरकारचा बदल्यांचा अधिकार कायम ठेवण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने बदल्यांच्या कार्यपद्धतीबाबत शासनावर ताशेरे ओढले. मूळ निर्णय कायम ठेवून शासन निर्णयानंतर बदलीविषयक निघालेली शुद्धीपत्रक रद्द करण्यात आली. या निर्णयाने शिक्षकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे राज्यभर आंदोलने केली. त्यामुळे बदली प्रक्रिया पूर्ण झालेली असताना आंदोलनाचा धसका घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या. ग्रामविकास खात्याने शिक्षक प्रतिनिधींना चर्चेला बोलावून बदल्यांचा सर्वसमावेशक मार्ग काढणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत शासनस्तरावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी वाढत आहे.
राज्य महामंडळ सभेत आंदोलनाची घोषणा
राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यासाठी शिक्षक संघाची राज्य महामंडळ सभा तातडीने मंगळवारी (दि. १७) पुणे येथे आयोजिण्यात आली आहे. सभेस राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व प्रमुख राज्यसंघ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.
...तर शिक्षक रस्त्यावर उतरतील
सर्वसमावेशक बदली धोरणाची मागणी करूनही कोणताही प्रतिसाद नाही. शिक्षक प्रतिनिधींशी चर्चेसाठीही सरकारला वेळ नाही, राज्यभरातील दोन लाख शिक्षक रस्त्यावर उतरतील. - बाळासाहेब मारणे
(जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे)
सर्वच बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता, संगणकामुळे गैरसोयीच्या बदल्या, महिलांची तालुक्याबाहेर गैरसोयीने बदलीची शक्यता.
यावर्षी बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, आॅनलाइन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. २० शाळांच्या पयार्यामधून शाळा न मिळाल्यास रँडम राऊंडमधून शाळा मिळणार असल्याने शिक्षक धास्तावले आहेत. प्रशासकीय बदल्या व संचमान्यतेनुसार समायोजन बदल्याही एकाच वेळी करण्यात येणार आहेत. मात्र, यावर्षीच्या संचमान्यतेमध्ये
काही शिक्षकांना पट असूनही अतिरिक्त ठरविल्याची माहिती
जिल्हा सरचिटणीस
खंडेराव ढोबळे यांनी दिली.