मुख्यमंत्र्यांच्या पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात गोंधळ, निवेदन देताना विद्यार्थ्यांना अडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:49 PM2019-06-23T12:49:24+5:302019-06-23T14:49:15+5:30
स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान अंतर्गत 16731कडुलिंब रोपांचे राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांना वाटप करत विश्वविक्रम करण्यात आला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना 16731 कडुलिंबाची रोपे वाटण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना स्टेजच्या बाजूला गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन द्यायचे होते. पण, पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले.
स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान अंतर्गत 16731कडुलिंब रोपांचे राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांना वाटप करत विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे सुद्धा उपस्तिथ होते. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मंचाच्या बाजूला काहीसा गोंधळ झाला. काही महिन्यांपूर्वी पुणे विद्यापीठातील रेफेक्टरीतील जेवणामध्ये सातत्याने अळ्या आढळून आल्या होत्या. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. त्यातच विद्यापीठाने रेफेक्टरी मध्ये जेवणासाठी नवी नियमावली तयार केली. नवे नियम जाचक असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी धक्काबुक्की झाली होती. विद्यापीठाने आंदोलनकर्त्या काही विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
विद्यापीठ प्रशासन रेफेक्टरी चालकाला पाठीशी घालत असून विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विद्यार्थी सोमनाथ लोहार मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी चालला होता तेव्हा गोंधळ झाला.