खूनप्रकरणी पतीसह चौघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:27 AM2018-06-12T03:27:12+5:302018-06-12T03:27:12+5:30

प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह ८ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने दिले.

Pune Murder case | खूनप्रकरणी पतीसह चौघांना कोठडी

खूनप्रकरणी पतीसह चौघांना कोठडी

Next

पुणे - प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह ८ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने दिले.
पती दत्ता वसंत भोंडवे (वय ३०, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे), प्रशांत जनगन भोर (वय २५, रा. माण रोड हिंजवडी, मूळ रा. इगतपुरी), पवन नारायण जाधव (वय २१, रा. हिंजवडी) आणि सोनाली बाळासाहेब जावळे (वय २५, रा. आदर्श कॉलनी वाकड, मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्यांची नावे आहेत. नासीर उल (रा. पश्चिम बंगाल) यांचा पोलीस शोध घेत आहेत. खून झालेल्या आईचे नाव अश्विनी (वय २५) व बाळाचे नाव अनुज (वय ८ महिने) असे आहे.
शनिवारी (९ जून) रात्री दहाच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे गावाच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्तीजवळ ही घडली होती. लुटीसाठी कोणी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करून पत्नी व बाळाचा खून केला. जवळचे ५० हजारही पळवून नेल्याचे आरोपी पती दत्ता भोंडवे याने पोलिसांना सांगितले होते. तसेच, स्वत:वर वार झाल्याचे भासवून रुग्णालयातही दाखल झाला होता. मात्र, बोलण्यातील विसंगतीतून तो १२ तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

सोनाली ही भोंडवे याची प्रियसी आहे. लग्नात अडथला ठरत असल्याने दोघांनी मिळून अश्विनीच्या कट रचला. अनूज आणि अश्विनी यांना क्लोरोफॉमचा वास देऊन व नंतर गळा आवळून मारल्याचे तपासातून पुढे येते. पोलिसांनी आत्तापर्यंत २ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी व पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रभाकर तरंगे यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने चारही आरोपींची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

Web Title: Pune Murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.