सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 05:43 PM2019-04-15T17:43:56+5:302019-04-15T17:47:01+5:30
गेल्या दाेन दिवसांपासून पुण्यात हाेणारा पाऊस तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम हाेता.
पुणे : गेल्या दाेन दिवसांपासून पुण्यात हाेणारा पाऊस तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम हाेता. आज दुपारी 4.30 च्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. आणखी दाेन ते तीन दिवस शहरात हलक्या सरी काेसळण्याची शक्यता आहे.
गेल्या दाेन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पुण्यात पावसाच्या हलक्या सरी काेसळत आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. गेले दाेन दिवस दुपारनंतर आभाळ भरुन येत असून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी काेसळत आहेत. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. आज दुपारी 4.30 च्या सुमारासच पावसाने हजेरी लावली. काेथरुड, डेक्कन, कर्वे रस्ता, धायरी, वडगांव बुद्रुक या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर हडपसर येथे गारांचा पाऊस झाला.
इराण, अफगाणिस्तान या देशांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील तीन दिवस उत्तर भारत, राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये जाेरदार पाऊस, गारपीट हाेण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.