जिल्ह्यात मोसमी पावसाचे पुनरागमन
By admin | Published: October 2, 2015 01:06 AM2015-10-02T01:06:01+5:302015-10-02T01:06:01+5:30
जिल्ह्याच्या काही भागांत आज ईशान्य मोसमी पावसाचे पुनरागमन झाले. कापूरव्होळ आणि शेलपिंपळगाव, खेड परिसर, तसेच पौड भागात आणि यवतमध्ये आज सायंकाळी पाऊस झाला.
पुणे : जिल्ह्याच्या काही भागांत आज ईशान्य मोसमी पावसाचे पुनरागमन झाले. कापूरव्होळ आणि शेलपिंपळगाव, खेड परिसर, तसेच पौड भागात आणि यवतमध्ये आज सायंकाळी पाऊस झाला.
बुधवारपासून परतीचा पाऊस सुरू होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. तो आज झालेल्या पावसामुळे प्रत्यक्षात आला असून, जोमदार पावसाच्या अपेक्षेत पुणे जिल्हा आहे.
दीर्घकाळानंतर सुरू झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी व सामान्य ग्रामस्थही अस्वस्थ होते. भातखाचरातील पाणी आटून उन्हाची तीव्रता वाढली होती. रब्बीच्या हंगामाची तयारी होत असतानाच पुरंदर, बारामती, इंदापूर या रब्बी पट्ट्यात शेतकरी पेरा करण्याबाबत संभ्रमावस्थेत होते.