सासवड भारतात एक नंबरचे शहर करणार - संजय जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:25 AM2018-01-06T02:25:45+5:302018-01-06T02:26:01+5:30
सर्वांच्या सहकार्याने सासवड शहराची सुधारणा करीत आहोत. केंद्र व राज्य शासनानेही कामांची दखल घेतली आहे. भविष्यात भारतातील एक नंबरचे सुंदर व सुरक्षित शहर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी नगरपालिकेच्या १५० व्या वर्धापनदिनी दिली.
सासवड - सर्वांच्या सहकार्याने सासवड शहराची सुधारणा करीत आहोत. केंद्र व राज्य शासनानेही कामांची दखल घेतली आहे. भविष्यात भारतातील एक नंबरचे सुंदर व सुरक्षित शहर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी नगरपालिकेच्या १५० व्या वर्धापनदिनी दिली.
वर्धापनदिनानिमित्त नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजिलेल्या स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ सोसायटी, स्वच्छ दुकाने या स्पर्धेचे बक्षीस वितरण जगताप यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे होते. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रास्ताविक केले.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात घेतलेल्या स्पर्धेत यशस्वी झालेल्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यामध्ये चिंतामणी हॉस्पिटल, माने हॉस्पिटल, किºहा स्वाद हॉटेल, सहारा सिल्व्हर सोसायटी, वीर बाजी पासलकर शाळा, संत नामदेव विद्यालय, श्रद्धा मेडिकल स्टोअर्स, शेती उद्योग भांडार यांचा गौरव करण्यात आला. घंटागाडी सेवक यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. नगरसेवकांच्या वतीने ‘डस्टबिन’ वाटप करण्यात आले.
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तनिष्का कोकरे हिने सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती यशवंत जगताप, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, नियोजन मंडळाचे सदस्य गिरीश जगताप, नगरसेवक संजयअण्णा जगताप, साळवी, शशिकांत काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पवार, राजिवडे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास लांडगे यांनी आभार मानले.
या वेळी माजी नगराध्यक्ष बापूसाहेब नानासाहेब जगताप, दत्तानाना जगताप, रामभाऊ वढणे, संतोष जगताप, संतोष गिरमे यांच्यासह उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक अजित जगताप, प्रवीण भोंडे, सचिन भोंगळे, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका मंगल म्हेत्रे, वसुधा आनंदे, डॉ. अस्मिता रणपिसे, विद्या टिळेकर, सारिका हिवरकर, नगरपालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
नागरिकांना मोफत वाय-फाय सुविधा, मीटरने पाणी, सुशोभीकरण अशी कामे करणारी सासवड ही एकमेव नगरपालिका आहे. सध्या सर्वत्र प्रदूषणाचा त्रास होत आहे. प्रदूषण वाढू नये, म्हणून ‘इ-रिक्षा’ सुरू करणार असल्याचे यावेळी संजय जगताप यांनी सांगितले.