शिरूर लोकसभेसाठी वळसे-पाटील उमेदवार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:02 AM2018-04-11T02:02:43+5:302018-04-11T02:02:43+5:30
शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.
शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.
याच वेळी अॅड. अशोक पवार किंवा प्रदीप कंद यांपैकी एक शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असेल असेही सूचित केले. येथे आयोजित हल्लाबोल सभेत पवार यांनी शिरूर हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद असताना तसेच जनताही आपल्या सोबत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होत असल्याबाबत खंत व्यक्त केली. याच वेळी उमेदवारीबाबत बोलताना वळसेपाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना वळसेपाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली लढत देतील व राष्ट्रवादीचा विजय होऊ शकेल, अशी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची भावना आहे. पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे मात्र आढळराव यांना पराभूत करू शकणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कोणाला पुढे करणार याबाबत राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता आता आहे. याबाबत पवार हे यावेळी फारच गंभीर असल्याच दिसून आले.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी गेली दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. तर जि. प. चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही यासाठी प्रयत्नशील आहे. आजच्या सभेत अॅड. पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या समोर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी हा पेच आहे. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्त्यात ठेवला. यामुळे या दोघांपैकी
एकाला शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पवार देणार हे मात्र नक्की झाले.
शिरूर लोकसभा व शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना पक्षाचा पराभव होतो, याबद्दल पवार यांच्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांनीही नाराजी व्यक्त केली. पराभव जनतेमुळे नाही तर व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे होतो, असेही त्यांनी सुनावले. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे असून लोकसभा व विधानसभेला कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारी द्या, असा सल्लाही दिला. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू, असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्तात ठेवला.