शॉर्ट सर्किटमुळे ७ एकर ऊस भस्मसात, कळंब येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:28 AM2017-11-29T02:28:00+5:302017-11-29T02:28:09+5:30
कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंचर : कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कळंब येथील धरणमळा व कहडणेस्थळ वस्तीवरील शेतकरी शशिकांत कानडे यांचा ३ एकर, महादू कहडणे यांचा ३.५ एकर व निर्मला कहडणे यांचा १ एकर, असा एकूण ७.५ एकर ऊस विद्युतवाहक तारांचा एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने जळून गेला आहे.
तसेच शेतात असणारी ड्रिपपाइप लाइन व पाण्याची पाइपलाइनही जळून खाक झाली आहे. एकूण २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती पंचायत समिती सभापती उषा कानडे यांनी दिली.
आग लागल्यानंतर शशिकांत कानडे, सुरेश कहडणे, विजय कहडणे, संदीप कहडणे तसेच महावितरणचे कर्मचारी अप्पासाहेब कांबळे त्यांच्या सहकाºयांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रमेश कानडे यांच्यासहा भीमाशंकर साखर कारखाना व
विघ्नहर साखर कारखान्यााचे
कृषी अधिकारी संदीप थोरात यांनी भेट दिली.
संबंधित शेतकरी महावितरणाविरुद्ध ग्राहक मंचाकडे दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महावितरणने शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.