गुळाच्या दरामध्ये मोठी घसरण, प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:03 AM2017-12-28T01:03:14+5:302017-12-28T01:03:30+5:30

पुणे : राज्यात गुळाची गु-हाळे पेटली असून, गुळाचा हंगाम जोमात सुरू आहे. यामुळे मार्केट यार्डात नवीन गुळाची आवक चांगलीच वाढली आहे.

Slowdown in sluggish price, declining rupee by Rs | गुळाच्या दरामध्ये मोठी घसरण, प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी घट

गुळाच्या दरामध्ये मोठी घसरण, प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी घट

Next

पुणे : राज्यात गुळाची गु-हाळे पेटली असून, गुळाचा हंगाम जोमात सुरू आहे. यामुळे मार्केट यार्डात नवीन गुळाची आवक चांगलीच वाढली आहे. सध्या मार्केट यार्ड येथील बाजारात दररोज २०० ते ३०० बॉक्स सेंद्रिय गूळ व ५ ते ६ हजार डाग दाखल होतो. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने मागील तीन वर्षांच्या तुलनेत गुळाच्या दरात एक हजार रुपयांची घट झाली असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.
आॅक्टोबरमध्ये राज्यात सर्वत्र झालेल परतीच्या पावसामुळे ऊसतोड काही प्रमाणात थांबली होती. यामुळे गुळाची गुºहाळेदेखील बंद पडली होती; परंतु त्याचा परिणाम गुळाच्या किमतीवर होऊन दरामध्ये मोठी वाढ झाली. त्यात मराठवाड्यातील दुष्काळाचादेखील दरवाढीवर परिणाम झाला. यामुळे येथील गुळाच्या उत्पादनामध्ये १० ते १५ टक्क्यांनी घट झाली. तर गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी भागांतून राज्यातील गुळाला मागणी वाढल्याने काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. याचा एकत्रित परिणाम होऊन राज्यात मोठी गूळ दरवाढ झाली. दरम्यान, मॉन्सून माघारी फिरल्यानंतर राज्यातील कराड, कोल्हापूर, सांगली, बारामती, अकलूज, नीरा व केडगाव या पेठांमधून मोठ्या प्रमाणात गूळ उत्पादनाला सुरुवात झाल्याने बाजारात आवक वाढली आहे. गूळ उत्पादनातून पैसे लगेच मिळत असल्याने बहुतांश शेतकºयांनी गुळाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे. बाजारात ५० ग्रॅमपासून १० किलोंपर्यंत गूळ उपलब्ध असून, त्याला घरगुती ग्राहक, मिठाईवाले तसेच परराज्यांतील व्यापाºयांकडून मागणी होत आहे. यामध्ये, रसायनविरहित असलेल्या सेंद्रिय गूळ तसेच गूळ पावडरला मागणी वाढत आहे.
>गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत गुळाच्या दरातील ही सर्वाधिक घसरण आहे. संक्रांतीमुळे बाजारात गुळाला मोठी मागणी आहे. मात्र, आवक जास्त असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. सध्याचे गुळाचे घटलेले दर येते काही दिवस कायम राहतील. संक्रांतीनंतर सोलापूर आणि लातूर परिसरातून गुळाची आवक सुरू होईल. मात्र, त्यानंतर गुळाचे दर उतरण्याची शक्यता कमी आहे. - शशांक हापसे, गूळ व्यापारी
>गुळाचा प्रकार सध्याचे दर आॅक्टोबर महिन्यातील
(प्रतिक्विंटल) दर (प्रतिक्विंटल)
पिवळा माल २९००-३०५० ४२००-४५००
मध्यम माल २८००-२९५० ३८००-४१००
लाल माल २६००-२७०० ३६००-३७५०
एक्स्ट्रॉ ३२००-३४०० ३९००-४१००
बॉक्स पॅकिंग ३०००-३४०० ४०००-४५००

Web Title: Slowdown in sluggish price, declining rupee by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.