अकरावीच्या प्रवेशासाठी आता होणार विशेष फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:02 AM2017-08-09T04:02:46+5:302017-08-09T04:02:46+5:30

इयत्ता अकरावी प्रवेशाची चौथी व अंतिम नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण होणार आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेºया घेण्यात येणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले जाणार आहे.

 Special rounds for the eleven to be used | अकरावीच्या प्रवेशासाठी आता होणार विशेष फेऱ्या

अकरावीच्या प्रवेशासाठी आता होणार विशेष फेऱ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची चौथी व अंतिम नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण होणार आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेºया घेण्यात येणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले जाणार आहे. महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना या फेºयांमध्ये सहभागी होता येणार नाही.
अकरावीच्या चौथ्या प्रवेश फेरीत सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. या फेरीत निवड झालेल्या चार
हजार विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही.
या फेरीनंतर पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये २० हजारांहून अधिक विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित असतील, असा अंदाज आहे. तसेच महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे चौथी फेरी पूर्ण झाल्यानंतर केवळ प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. चौथ्या फेरीअखेर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी या फेरीतून बाद होतील. प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या व कोणतेही महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी प्रवेश अर्जाचा भाग दोन पुन्हा भरावा लागणार आहे. जे विद्यार्थी नव्याने भाग दोन भरतील, तेच विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. अद्याप प्रवेश अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत सहभागी होता येणार आहे. या फेरीचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले जाणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, विशेष फेरीची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. भाग दोनमध्ये बदल करणे, नव्याने अर्ज करणे, अपूर्ण अर्ज पूर्ण भरणे या कामासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाईल. तसेच नव्याने अर्ज करणाºया विद्यार्थ्यांना मागर्दर्शन केंद्रावर जाऊन अर्ज अप्रुव्ह करून घ्यावा लागणार आहे.

विद्यार्थी-पालकांची गर्दी

चौथी फेरी बुधवारी पूर्ण होणार असल्याने अद्यापही प्रवेशासाठी निवड न झालेले, तसेच पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड होऊनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी व पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. गुणवत्ता असूनही अद्याप प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व पालकांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही, यापुढे फेºया होणार की नाहीत, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले. समितीकडून प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने विद्यार्थी
व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शंभरहून अधिक विद्यार्थी व पालक या वेळी जमा झाले होते. सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत पुढील प्रवेश फेरीबाबत माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार निश्चितपणे प्रवेश मिळेल. अखेरच्या विद्यार्थ्यापर्यंत आॅनलाइन प्रवेश दिला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थी व पालकांचे काहीसे समाधान झाले.

आजपासून अकरावीचे वर्ग
ज्या कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीचे प्रवेश ७५ टक्के झाले आहेत, त्या महाविद्यालयांचे वर्ग बुधवारपासून (दि. ९) सुरू करण्यात यावेत, अशा सूचना शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. उर्वरित फेºयांमध्ये जे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी रविवार व सुटीच्या दिवशी विशेष वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यावा, असेही टेमकर यांनी स्पष्ट केले आहे

Web Title:  Special rounds for the eleven to be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.