राज्य बास्केटबॉल : पुणे महिला संघास जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:52 AM2018-01-03T03:52:11+5:302018-01-03T03:52:25+5:30

महाराष्ट्र बास्केटबॉल संघटना आयोजित ६८व्या महाराष्ट्र आंतरराज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या महिला संघाने नागपूर संघाचा ६६-४२ गुणांनी पराभव करून विजेतेपद जिंकले.

 State Basketball: Pune Women's Team of the Year | राज्य बास्केटबॉल : पुणे महिला संघास जेतेपद

राज्य बास्केटबॉल : पुणे महिला संघास जेतेपद

Next

पुणे : महाराष्ट्र बास्केटबॉल संघटना आयोजित ६८व्या महाराष्ट्र आंतरराज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या महिला संघाने नागपूर संघाचा ६६-४२ गुणांनी पराभव करून विजेतेपद जिंकले. पुरुष गटात मात्र पुणे संघाला मुंबई दक्षिण पूर्व संघाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे दुहेरी जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले.
माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुणेकरांनी सहज जेतेपद पटकावताना नागपूरचे आव्हान ६६-४२ गुणांनी परतावले.
चारही क्वार्टरमध्ये पुणेकरांनी २४-१४, १४-११, १५-८, १३-९ असे वर्चस्व राखत बाजी मारली. रुपाली त्रिपाठी (१५), श्रुती शेरीगर (१४) आणि शिरीन लिमये (१४) यांनी नागपूरविरुद्ध वर्चस्व मिळवले. श्रेया दांडेकर (१५), मुग्धा अमरावतकर (१३) आणि रसिका पांडे (१२) यांनी नागपूरकडून अपयशी झुंज दिली. मुंबई उत्तर संघाने साताºयाचा ७९-६२ असा पराभव करत तिसरे स्थान पटकावले.
पुरुषांच्या गटात मुंबईकर पहिल्या क्वार्टरमध्ये १४-२४ असे पिछाडीवर पडले होते. मात्र, या संधीचा फायदा उठविण्यात पुणेकर अपयशी ठरले. यानंतर मुंबईकरांनी जबरदस्त पुनरागमन करताना सर्वाधिक गुणांची कमाई करत पुण्याचा १४-२४, १८-१२, २६-१४, २२-२७ असा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली.
अमित गहलोत (२०) आणि इम्रान सिद्दिकी (१९) यांनी मुंबई दक्षिण-पूर्व संघाच्या जेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले. पुण्याकडून युसूफ सय्यद (२०), एडविन आर्यविन (२०) यांनी झुंज दिली. त्याच वेळी, तिसºया स्थानाची लढत मुंबईकरांमध्येच झाली. यामध्ये मुंबई सेंट्रलने ८२-५५ असा सहज विजय मिळवताना मुंबई दक्षिण-पश्चिमचा पराभव केला.

Web Title:  State Basketball: Pune Women's Team of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.