पीएमपी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:40 PM2018-01-04T15:40:20+5:302018-01-04T15:42:53+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने ते दडपणाखाली काम करीत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील तणाव वाढत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे.
याबाबतचे पत्र युनियनचे अध्यक्ष किरण थेऊरकर यांनी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना दिले आहे. प्रत्येक विभागातील मनुष्यबळ कमी करण्यात आल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले असून दडपणाखाली काम करीत आहेत. यामध्ये त्यांच्यामध्ये अंसतोष वाढत आहे. त्यामुळे प्रशासन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संंबंध निर्माण होणे आवश्यक असल्याने कामगार कायद्यानुसार तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.