रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळुन अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:52 PM2018-08-22T14:52:57+5:302018-08-22T15:06:53+5:30
झारगडवाडी येथील महेश मासाळ हा आकांक्षा शाळेत जात असताना पाठीमागे येत असत. तसेच तो तिची छेडछाड देखील करत होता.
बारामती: झारगडवाडी (बारामती ) येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळुन विषप्राशन करुन आत्महत्या केली.आकांक्षा प्रदीप दरेकर (वय १६) असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.आकांक्षा हिने ११ आॅगस्ट रोजी विषारी औषध प्राशन के ले होते.तेव्हापासुन तिची मृत्युशी झुंज सुरु होती.अखेर बुधवारी(दि २२) सकाळी बारामती येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. आकांक्षा ही येथील कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. याबाबत तिचा चुलत भाऊ सुरज दरेकर याने बारामती ग्रामीण पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यामुळे पोलिसांकडूनगुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकांक्षा हिने याबाबत कुटुंबियांना सांगितले होते. झारगडवाडी येथील महेश मासाळ हा आकांक्षा शाळेत जात असताना पाठीमागे येत असत. तसेच तो तिची छेडछाड देखील करत होता. त्यामुळे तिने त्याच्या त्रासाला कंटाळुन घरात जनावरांसाठी आणलेले गोचिडाचे औषध पित आत्महत्या केली आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती ‘लोकमत’ शी बोलताना दिली.