उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी सर्व्हे, घोरपडी रेल्वे पुलासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती, आढळराव पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:09 AM2017-09-23T00:09:41+5:302017-09-23T00:09:43+5:30

घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, या संस्थेने भूसंपादनासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे. या महिन्याअखेर हे काम पूर्ण होईल.

Survey for the flyoery land, appointment of advisory body for Ghorpadi railway bridge, information of Abhalerao Patil | उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी सर्व्हे, घोरपडी रेल्वे पुलासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती, आढळराव पाटील यांची माहिती

उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी सर्व्हे, घोरपडी रेल्वे पुलासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती, आढळराव पाटील यांची माहिती

Next

हडपसर : घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, या संस्थेने भूसंपादनासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे. या महिन्याअखेर हे काम पूर्ण होईल. तसेच विषय मान्यतेसाठी महापालिकेच्या मुख्य सभेत सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
मतदारसंघातील विविध नागरी समस्यांसंदर्भात आढळराव पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार व विविध विभागांच्या अधिकाºयांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत हडपसर भागातील विविध समस्यांबाबत चर्चा करताना अपुºया पाणीपुरवठ्याबाबत अधिकारी सातत्याने अनास्था दाखवत असल्याबद्दल खासदार यांनी नापसंती दर्शविली. त्यानंतर आयुक्तांनी पंपाची संख्या तातडीने वाढवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.
ससाणेनगर-हांडेवाडी येथील रेल्वे मार्गावरील भूमिगत रस्त्याच्या रेंगाळलेल्या भूसंपादनाबाबतच्या कार्यवाहीबाबतही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण काढण्याची कारवाई एकाच वेळी सुरू का केली नाही, असे आढळराव यांनी विचारले असता या महिनाअखेर भूसंपादनाची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले.
मोकाट डुकरांचा त्रास कमी करण्यासाठी टेंडर काढले असून हे डुक्कर पकडण्यात येतील, असे मागील बैठकीत सांगण्यात आले होते. मात्र ती यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी सांगितले. त्यावर एक महिन्यात मोकाट डुक्कर पकडण्याची कारवाई करावी, अन्यथा संबंधित अधिकारी जबाबदार धरण्यात येईल, अशी समज आयुक्तांनी दिली.
हांडेवाडी रस्ता नो हॉकर्स झोन करण्याची प्रक्रिया सुरू असून मुख्य सभेपुढे हा विषयमान्यतेसाठी महिनाभरात सादर करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर पारगेनगर परिसरातील रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी संबंधित जागामालकांशी चर्चा सुरू असून जागामालकांना टीडीआर आदीच्या माध्यमातून रस्त्यासाठी तडजोडीने जागा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती देण्यात आली. या वेळी संगीता ठोसर, तानाजी लोणकर, नगरसेवक विजय देशमुख, अमोल हरपळे उपस्थित होते.
केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा आदेश
कात्रज-कोंढवा रस्ता करण्यासाठी पुणे महापालिका इतका मोठा खर्च का करते, असा सवाल करून खासदार आढळराव पाटील म्हणाले, की हा राष्टÑीय महामार्गांना जोडणारा रस्ता करण्यासाठी केंद्र सरकार निधी देऊ शकते. त्यावर यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले.

Web Title: Survey for the flyoery land, appointment of advisory body for Ghorpadi railway bridge, information of Abhalerao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.