थायलंडचे लष्करप्रमुख दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 06:19 PM2018-09-17T18:19:42+5:302018-09-17T19:13:39+5:30
थायलंडचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कोकार्ट बुखाओ यांसह थायलंडच्या लष्करी अधिका-यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.
पुणे : पुण्याची शान म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या दगडूशेठ गणपतीचे अाकर्षण भारतातच नाही तर परदेशातील भक्तांना देखील अाहे. याचीच प्रचिती म्हणजे अाज थायलंडच्या लष्करप्रमुखांसह सेनाधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत अारती केली. पुण्यामध्ये लष्करी सरावाकरीता ते अाले अाहेत.
थायलंडचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कोकार्ट बुखाओ यांसह थायलंडच्या लष्करी अधिका-यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे सुनिल रासने, महेश सूर्यवंशी, उल्हास भट यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा दगडूशेठ गणपतीची सजावट राजराजेश्वर मंदिराची अाहे. त्याचेही काैतुक बुखाअाे यांनी यावेळी केले.
थायलंडच्या लष्करी अधिका-यांप्रमाणेच भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, देवीसिंग शेखावत यांनी देखील गणरायाचे दर्शन घेत आरती केली. तर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी दिवसभरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.