...तर भिडे गुरुजींचे अांबे बाजारात दाखल हाेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:42 PM2018-06-11T16:42:32+5:302018-06-11T16:42:32+5:30

भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा अंनिसकडून निषेध करण्यात अाला असून, त्यांचे वक्तव्य तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात अाली अाहे.

...then mango of bhide guruji will be in the market | ...तर भिडे गुरुजींचे अांबे बाजारात दाखल हाेतील

...तर भिडे गुरुजींचे अांबे बाजारात दाखल हाेतील

googlenewsNext

पुणे : आंबे खाऊन जर मुले हाेत असतील तर भिडे गुरुजींचे अांबे उद्या बाजारात देखील दाखल हाेतील, स्वतःच्या अांब्यांची जाहिरात करण्याची ही एक पद्धत असून त्यांच्या वक्तव्याची शहानिशा करुन त्यांच्यावर जादुटाेना विराेधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी केली अाहे. 


    माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी नाशिक येथील त्यांच्या सभेत केला हाेता. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचेही भिडे यावेळी सभेत म्हटले हाेते. त्यांच्या या वक्तव्याचा अंनिसकडून निषेध करण्यात येत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत अाहे. 


    याबाबत बाेलताना मिलींद देशमुख म्हणाले, अांबे खाऊन मुल हाेते असा दावा करणे हे जादुटाेना विराेधी कायद्यान्वे गुन्हा अाहे. नागरिकांनी वैद्यानिक दृष्टिकाेन ठेवायला हवा. भिडेंचे हे वक्तव्य पाहता त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याचे दिसते. तसेच या देशात मनस्मृती लागू करण्याचे काम ते करत अाहेत. गुरुजींच्या धारकऱ्यांनी विचार करावा की अापले गुरुजी अापल्याला कुठल्या युगात नेऊ इच्छितात. पाेलीसांनी याची दखल घ्यायला हवी. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी अंनिसची मागणी अाहे. तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवू नये अशी समज त्यांना पाेलीसांनी द्यायला हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अाहे याचा अर्थ असा नाही की काहीही बाेलावं. अामची सरकारकडे मागणी अाहे की त्यांचे वक्तव्य तापासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. 

Web Title: ...then mango of bhide guruji will be in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.