स्वस्त धान्य दुकानात मिळणार ५५ रुपये दराने तूरडाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:58 AM2017-12-15T02:58:57+5:302017-12-15T02:59:03+5:30
स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, पुणे शहरासाठी २०० मेट्रिक टन तूरडाळ उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षी तूरडाळीच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.
पुणे : स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, पुणे शहरासाठी २०० मेट्रिक टन तूरडाळ उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षी तूरडाळीच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.
राज्यात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन वाढले होते. खुल्या बाजारामध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने व्यापाºयांकडून तूर खरेदी करण्यात येत होती. शासनाने शेतकºयांची तूर हमीभावाने खरेदी केली होती. शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५.२५ लाख क्विंटल तूर खरेदी केली. भरडलेली ही तूर स्वस्त धान्य दुकानांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील दर शिधापत्रिकेमागे १ किलो तूरडाळ दिली जाईल. शहरात ३ लाख ८१ हजार ८१३ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेतील संख्या १२ हजार ६३१, तर अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ३ लाख ६९ हजार १८२ आहेत. स्वस्त धान्य दुकानात मिळणारी तूरदाळ ५५ रुपये किलो दराने मिळणार आहे. मात्र, बाजारात ५५ ते ६५ रु. प्रमाणे डाळ मिळत आहे.