पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना प्रॉपर्टी सेलने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:18 PM2017-12-26T18:18:23+5:302017-12-26T18:26:16+5:30

दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Two people, who were involved in the burglary in Pune city, have been arrested by the police | पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना प्रॉपर्टी सेलने केली अटक

पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना प्रॉपर्टी सेलने केली अटक

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपींनी पुणे शहर व परिसरात एकूण ५२ घरफोडीचे गुन्हे केले असून दिली कबुलीएकूण ४६ लाख ५८ हजार ७४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी पुणे शहर व परिसरात एकूण ५२ घरफोडीचे गुन्हे केले असून त्याची कबुली दिली आहे. त्यांनी केलेल्या घरफोड्यांमधील एकूण ४५ लाख ८ हजार रुपयांचे १६१ तोळे सोन्याचे दागिने, २० हजार ७४० रोख रक्कम, ३० हजार रुपये किंमतीचे मोबाईल, लॅपटॉप, गुन्ह्यात वापरलेली २ दुचाकी वाहने ज्याची किंमत १ लाख तर घरफोडी करण्याचे साहित्य असा एकूण ४६ लाख ५८ हजार ७४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक इजाज शिलेदार, पोलीस हवालदार अनिल उसुलकर, अमोल भोसले, यशवंत खंदारे, दिनकर भुजबळ, सुभाष कुंभार, दत्ता गरुड, संजय जगताप, संजय सुर्वे, संभाजी गायकवाड, अनिल शिंदे, निजाम तांबोळी, संजय ढोले यांनी केली.  

Web Title: Two people, who were involved in the burglary in Pune city, have been arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.