दुचाकींची गर्दी जाहली उदंड , प्रादेशिक परिवहन कडून शहरातील वाहनांची आकडेवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:14 PM2018-04-05T14:14:57+5:302018-04-05T14:14:57+5:30

two-wheeler numbers Significant increase , city's vehicals data released by RTO | दुचाकींची गर्दी जाहली उदंड , प्रादेशिक परिवहन कडून शहरातील वाहनांची आकडेवारी जाहीर

दुचाकींची गर्दी जाहली उदंड , प्रादेशिक परिवहन कडून शहरातील वाहनांची आकडेवारी जाहीर

Next
ठळक मुद्देवाहनसंख्या पोहचली ३६ लाख २७ हजारांवरगेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर

पुणे :  पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता दुचाकीकरांचे शहर अशीच करुन द्यावी लागेल. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० वर पोहचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर पडली आहे. 
प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षभरात (एप्रिल २०१७  ते मार्च २०१८) दुचाकींच्या संख्येत २ लाख ५ हजार ८०४ ने वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ४५ हजार ६८३ वर पोहचली असून, त्यात ५६ हजार ४१० वाहनांची भर पडली. 
टॅक्सी कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलिव्हरी व्हॅनची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्कूल बस, रूग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, टँकर, ट्रॅक्टर, ट्रेलर, मालवाहू वाहनांची विक्री गेल्या वर्षी इतकीच झाली आहे. रिक्षांचे परवाने खुले केल्याने यावर्षी तब्बल ८ हजार २२३ नवीन रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. आता शहरातील रिक्षांची संख्या ५३ हजार २२७ इतकी झाली आहे. 
टॅक्सी कॅबच्या संख्येत ५ हजार ६४८ने वाढ झाली असून, त्यांची संख्या २८ हजार ३४४ झाली आहे. चार चाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या ४ हजार ३५३ने वाढून ४७ हजार १३५ आणि तीन चाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या १ हजार ५२२ने वाढून ३३ हजार ८९५ झाली आहे. ट्रक-लॉरीची संख्या ३ हजार ८९० ने वाढून ३८ हजार ५९८ वर पोहोचली आहे. स्कूल बसच्या संख्येत २८३ने वाढ झाली असून, ते २ हजार ५६४ झाली. 
शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३१ लाख १५ हजार इतकी आहे. गेल्या ७ वर्षांत लोकसंख्येत ४ लाखांची वाढ गृहित धरली, तरी शहरातील वाहनांची संख्या दरडोईपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.  

---------------------------------

वाहन नोंदणीचे वार्षिक उड्डाण
वाहन प्रकार     २०१३-१४     २०१४-१५     २०१५-१६     २०१६-१७       २०१७-१८
दुचाकी         १,४५,७९४   १,६६,१९९      १,७८,१५७      १,७९,६७३       २,०५,८०४
चारचाकी          ४१,५०७      ४५,९४४     ४६,६०९      ४९,७५५       ५६,४१०
एकूण वाहने     १,९७,०२८      २,३३,५९६     २,४९,४७८      २,७०,३०७        २,८९,९१०

Web Title: two-wheeler numbers Significant increase , city's vehicals data released by RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.