धमक असेल तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:18 PM2018-10-22T16:18:50+5:302018-10-22T16:19:59+5:30
विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे पुण्यात माेर्चा काढण्यात अाला. यावेळी अजित पवारांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.
पुणे : मुंबई शिवसेनेच्या हातात असताना एेवढ्या वर्षात शिवसेनेला बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा अापल्या वडीलांचं स्मारक बांधावं. त्यानंतर लाेकांना त्यांच्याबद्दल खात्री पटेल. लाेकांना भावनिक करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात येत अाहे. उद्धव ठाकरेंमध्ये धमक असेल तर त्यांनी अयाेध्येला राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे अाव्हानच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी तर्फे अाज पुण्यात माेर्चा काढण्यात अाला. कॅम्पातील मेमाेरिअल हाॅलपासून विभागीय अायुक्त कार्यालयापर्यंत हा माेर्चा काढण्यात अाला. त्यानंतर पवार पत्रकारांशी बाेलत हाेते. या माेर्चात खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते. पवारांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. पवार म्हणाले, मंदिराचं राजकारण निवडणूका डाेळ्यासमाेर ठेवून करण्यात येत अाहे. यांना राम मंदिर करायचं असतं तर चार वर्ष हाेऊन गेले भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेत येऊन. चार वर्ष राम मंदिर बांधण्यापासून त्यांना काेणी थांबवलं नव्हतं. चार वर्षात त्यांना हवं ते करु शकत हाेते. पण देशात काही राजकीय पक्ष अाणि त्यांचे नेते असे अाहेत की ते निवडणूकीच्या काळात भावनिक मुद्दे काढतात. जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतात. सर्व जाती धर्माच्या लाेकांत विष कालवण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून सुरु अाहे. अाता जनता सुज्ञ झाली अाहे. त्यांना कळतं यांना अाताच राम मंदिराचा मुद्दा का अाठवला ते.
शिवसेना नेहमी दुटप्पी भूमिका घेते. शिवसेना म्हणते कर्जमाफी मध्ये भ्रष्टाचार झाला. हा भ्रष्टाचार झाला तर तुमचे मंत्री काय करत हाेते. त्यांनी ताे उघडकीस का अाणला नाही. अाज जनता त्रासलेली अाहे. महागाईला भाजप साेबत शिवसेनाही जबाबदार अाहे. या सरकारच्या सगळ्या अपयशांमध्ये शिवसेनाही तितकीच वाटेकरी अाहे. असेही पवार यावेळी म्हणाले. सराकराने तात्काळ दुष्कार जाहीर करावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत करावी, भारनियमन रद्द करावे, बेराेजगारी दूर करण्यासाठी पाऊले उचलावीत, महागाई कमी करावी या मागण्यांसाठी माेर्चा काढण्यात अाला.