कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:17 PM2018-01-22T12:17:23+5:302018-01-22T12:20:36+5:30

कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर या महिन्यात नुकत्याच झालेल्या वि. स. खांडेकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

V. S. Khandekar-Ek Nandadeep 'program In Kamla Nehru Park Pune | कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ कार्यक्रम

कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ कार्यक्रम

Next
ठळक मुद्देगीता भुर्के यांनी घडविले 'ययाती' कादंबरीचे एकपात्री दर्शन वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर पीएचडी केलेल्या सुनंदा वाघ यांचा सत्कार

पुणे : कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर या महिन्यात नुकत्याच झालेल्या वि. स. खांडेकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम शाम व गीता भुर्के यांनी सादर करून खांडेकरांचे साहित्य उलगडले. 
श्याम भुर्के म्हणाले, की खांडेकरांचे गद्य हे इतर कवींच्या पद्यापेक्षाही काव्यमय आहेत. त्यांच्या साहित्यात वाचकाचे नैराश्य नाहीसे करण्याचे सामर्थ्य आहे. नाटक, कादंबरी, कथासंग्रह, रूपककथा, लघुनिबंध, रसग्रहणग्रंथ, संपादन, चित्रपटकथा अशा प्रकारांत त्यांनी १३० ग्रंथ लिहिले. त्यांच्या ‘ययाती’ कादंबरीस मराठीतील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले. सन १९४१ मध्ये सोलापूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. नाट्यसंमेलनाध्यक्ष झाले. ‘पद्मभूषण’ हा सन्मान त्यांना प्राप्त झाला.
माणुसकी देहरूपाने दाखवायची असेल तर वि. स. खांडेकर या साहित्यिकाकडे पाहावे  लागेल. खांडेकरांचे साहित्य वाचणाऱ्याचे मन निर्मळ होते. तो काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त होतो, हे साहित्य आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन  शाम भुर्के यांनी केले.
गीता भुर्के यांनी 'ययाती' कादंबरीचे एकपात्री दर्शन घडविले. त्यास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर पीएचडी केलेल्या सुनंदा वाघ यांचा या वेळी माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अलका घळसासी यांनी आभार मानले. 

Web Title: V. S. Khandekar-Ek Nandadeep 'program In Kamla Nehru Park Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे