महामेट्रोच्या डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:59 PM2019-03-19T16:59:43+5:302019-03-19T17:03:09+5:30
महामेट्रोचे व्यवसथापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : महामेट्रोचे व्यवसथापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामेट्रोच्यावतीने आचार संहिता लागू झाल्यावर पुणे मेट्रोचे काम पूर्ण होऊन डिसमेंबरपर्यंत मेट्रो सुरु होईल अशी घोषणा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या दीक्षित यांनी दिली आहे. यामध्ये पहिला टप्प्यात असलेल्या वनाज ते डेक्कनपर्यंतची मेट्रो धावेल असेही त्यांनी म्हटले होते.ही घोषणा आचारसंहिता भंग करते असे आचारसंहिता कक्षाचे मत झाले. त्यांच्यानुसार महसूल विभागाने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात 1 महिना शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्यात अटक होत नाही. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली.