शिवनेरी किल्ल्यास विविध शाळांची भेट
By admin | Published: February 16, 2017 02:54 AM2017-02-16T02:54:32+5:302017-02-16T02:54:32+5:30
स्वराज्याच्या निर्माणाची, वाट ही आडवळणाची. शत्रूसाठी संकटाची, शिवबासाठी अडथळ्याची. तरीही नाही डगमगले मावळे, राजासाठी
खोर : स्वराज्याच्या निर्माणाची, वाट ही आडवळणाची. शत्रूसाठी संकटाची, शिवबासाठी अडथळ्याची. तरीही नाही डगमगले मावळे, राजासाठी हाकेला धावले. कोठे कोठे हर हर महादेवाचा नारा घुमला, तेथे तेथे शिवनेरीच्या कडेकपारी, गनिमी काव्याच्या गाथा स्फुरल्या.
या ओळीप्रमाणे गड, तटबंदी, माची, बुरुज, कडेलोट, जंगल, चिंचोळा रस्ता अशा पुस्तकातील अनेक शब्दांची उकल करण्याचा व हे याचि देही याचि डोळा दाखविण्यासाठी देऊळगावगाडा (ता. दौंड) केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पडवी, विठ्ठलवाडी, माळवाडी, देऊळगावगाडा, खोर येथील पाटलाचीवाडी, हरिबाचीवाडी, माळीमळा, देशमुखवाडी, दुर्गडे-बारवकरवस्ती या शाळांनी सहलीचे आयोजन करून शिवनेरीभेटीचा योगायोग लहान बालसैनिकांना करून दिला आहे.
खांद्यावर भगव्या पताका घेऊन जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी, हरहर महादेव अशा घोषणांचा जयजयकार करीत चिमुकल्यांची आपली पावले राज्याच्या शिवाजीच्या जन्मस्थानाकडे गेली.
या वेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांस किल्ल्यावरील लहान-मोठे कुंड, शिवजन्मस्थळ, तेथील पाळणा, कडेलोट टोक, तेथून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, शिवाईचे मंदिर, अंबरखाना याविषयीची प्रत्यक्षात माहिती देण्यात आली.
गडावर बरोबरच अष्टविनायक मार्गातील लेण्याद्री, ओझर, भीमाशंकर या स्थळांना भेट देण्यात आली.
सहलीचे आयोजन युवराज घोगरे, संदीप ढगे, शिवाजी वामन, प्रकाश कोंडे, शरद चांदगुडे, अनिता कोंडे, कावेरी बारवकर, शैला वाघ, सारिका दिवेकर, मनीषा चव्हाण, तानाजी तळेकर, मेधा रासकर, स्मिता झगडे, वृषाली बारवकर, अनिता शितोळे, सुभाष शिर्के यांनी केले होते.