पाेलीस शिपाई हाेण्यासाठी तरुण निघाले मुंबईला पळत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:20 PM2019-02-07T15:20:58+5:302019-02-07T15:25:08+5:30
पाेलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला.
पुणे : पाेलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला. या माेर्चेकरांमधील काही तरुण हे आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन मुंबईला पळत निघाले आहेत. 11 फेब्रुवारी राेजी ते मुंबईतील आझाद मैदान येथे पाेहचणार आहेत.
शासनाने पाेलीस भरतीतील नियमांमध्ये बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार पहिल्यांदा शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून त्यातनंत 1 : 5 याप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीस मुले पात्र ठरविण्यात येणार आहेत. ही शारीरीक क्षमात ही फक्त 50 गुणांची हाेणार आहे. त्यामुळे राज्यातील पाेलीस दलास शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची उपलब्धता हाेण्याबाबत शंका आहे व हा निकष परीक्षेच्या अगदी ताेंडावर बदलल्याने वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे व नैराश्याचे वातावरण आहे.
पाेलीस शिपाई पदासाठी अनेक बारावी पास तरुणांनी अर्ज केले आहेत. नव्या निकषानुसार परीक्षा झाल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अधिक विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण हाेतील अशी शक्यता हे तरुण व्यक्त करत आहेत. तसेच जे विद्यार्थी वर्षानुवर्षे फिटनेससाठी मेहनत घेतात त्या विद्यार्थ्यांना डावलने जाण्याची भीती या माेर्चेकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सरकारने जुन्याच निकषांनुसार आधी शारीरिक चाचणी घ्यावी व नंतर लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी हे तरुण करत आहेत.