महामार्गावर २०१७ मध्ये ८७८ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:17 AM2018-01-01T07:17:44+5:302018-01-01T07:17:56+5:30
गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत.
- सिकंदर अनवारे
दासगाव : मुंबई - गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत. मावळत्या २०१७ची अपघाताची आकडेवारीमध्ये पनवेल पळस्पे ते कसाल (सिंधुदुर्ग) या ४५० कि.मी.च्या अंतरामध्ये ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले असून १०३ प्रवाशांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर या मार्गावरून बेदरकारपणे चालणाºया व नियमाचा उल्लंघन करणाºया वाहनांची तपासणी करत १,०१,५०४ वाहनचालकांवर कारवाई करत २,०३,४७३०० रुपये दंड वसूल केला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा महामार्ग आहे. नेहमी सुट्टीच्या काळात व शिमगा व गणपती सणाच्या काळातला महामार्ग मोठ्या प्रमाणात गजबजलेला असतो. दरवर्षी महामार्ग पोलीस, महामार्ग बांधकाम विभाग, आरटीओ यांच्याकडून अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. वाहनचालकांना सुरक्षिततेबाबतचे धडे दिले जातात. डोळे तपासणी शिबिर घेतली जातात. मात्र, एवढे होत असताना वाहनचालकांकडून त्याचप्रमाणे सहकार्यदेखील अपेक्षित असते. महामार्गावर पडणारे खड्डे, अवघड वळण, अरुंद महामार्ग हे सर्व पाहिले तरी नेहमी वाहनचालकांच्या चुकांमुळेच अपघात घडताना दिसून येतात. २०१७मध्ये महामार्ग वाहतूक शाखेमार्फत मोठ्या प्रमाणात वाहनचालकांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनचालकांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. अपघातांना रोखता येईल. अनेक वर्षांपासून या मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांना थांबविण्यासाठी उपाय अद्यापही कोणाकडे नाही. हे सर्व झालेल्या अपघाताची नोंदीव्यतिरिक्त महामार्गावर किरकोळ अपघातांची नोंद नाही. वाहनचालकांनी आपसामध्ये तडजोड करून मिटवली आहे.
मुंबई कोकणात येणारे वाहन चालक हे नेहमी नवीन असल्याने त्यांना रस्त्याचा अनुभव नसतो. घाट विभागात अनेक सुरक्षिततेचा अभाव आहे. अपघातामध्ये तरुणांचा समावेश जास्त आहे. अरुंद रस्ता, खड्डे, महामार्गावर लावलेलं दिशा दर्शनाना फलक कमी आहेत. तर खराब अवस्थेत आहेत. साइडपट्टी नाही. पावसामध्ये रस्त्याकडेला उगवलेल्या गवतामुळे समोरील वाहनांना येणारे वाहन दिसत नाही. वळणाशेजारी असलेल्या टेकड्या व वाहनचालकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालवणे. यामुळेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात.
- डी. के. पाटील,
पोलीस निरीक्षक महामार्ग
वाहतूक शाखा, रत्नागिरी