काजूबियांचे उत्पादन जोरात; जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतून शेकडो टन माल निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:34 AM2018-04-20T00:34:22+5:302018-04-20T00:34:22+5:30
कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेले ड्रायफ्रुट काजू व त्याच्या बी चे जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन शेकडो किलो माल निर्यात होत असल्याने काजु बीचे व्यापारी खुशील सहाने यांनी सांगितले.
- हुसेन मेमन
जव्हार : कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेले ड्रायफ्रुट काजू व त्याच्या बी चे जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन शेकडो किलो माल निर्यात होत असल्याने काजु बीचे व्यापारी खुशील सहाने यांनी सांगितले.
जव्हार हे संस्थानकालीन शहर आहे. येथील श्रीमंत राजे यांनी आपल्या महलाच्या २० ते २५ ऐकर मध्ये काजुचे झाड लावलेले आहेत, त्यामुळे काजुचे दरवर्षी जवळ जवळ ५००० किलो माल या एकट्या बागेतून निघत असतो. याकरीता काही व्यापारी या बागेची सिझनपुर्ती बोली करून माल मिळवतात. आणि हा माल विविध ठिकाणी विक्री करतात.
तालुक्यातील खेडोपाड्यात प्रकल्प कार्यालयामार्फत फळबाग योजनेतुन तसेच बायफ मित्र व इतर संस्थांच्या मदतीने हजारो काजुचे रोप देऊन बाग तयार करण्यात आलेल्या आहेत. यातूनही भल्या मोठ्या प्रमाणात काजु बी निघते. त्यामुळे येथील शेतकरी येथील छोट्या खानी असलेल्या व्यापारी जमलेला किरकोळ व घाऊन माल विक्री करतात आणि हे व्यापारी तोच माल आपला नफा लावून थेट विक्री करतात.
दरवर्षाप्रमाणे यंदाच्या मोसमामध्ये काजू बी चे उत्पादन चांगले झाल्यामुळे शेतकरी व व्यापारी आनंदी असल्याचे चित्र दिसत आहे, काजु गर हे जगप्रसिध्द असल्यामुळे त्याला चांगला भावही मिळतो. यामध्ये शेतकरी छोटी बी १२० ते १२५ रू किलोने विकतो तर मोठे बी १४५ ते १५५ रू. प्रती किलो दरात विकतो, त्यामुळे मालाला चांगली किमतही मिळत आहे.
यंदाचा सिझन चांगले आहे, माल छोटा, मिडयम व मोठा अशा तिन प्रकारात येतो, जसा माल असेल तसे दर शेतकऱ्यांना दिले जातात, आणि या मालाची विक्री कर्नाटक, नाशीक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे या जिल्ह्यातील मोठे व्यापरी घेऊन जातात.
-खुशील सहाने,
व्यापारी, अंबीका चौक, जव्हार