सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौऱ्याला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:11 AM2018-08-31T11:11:57+5:302018-08-31T12:15:01+5:30

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौरा सुरू झाला आहे.

chandrakant patil inspects potholes on mumbai goa highway | सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौऱ्याला सुरुवात

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौऱ्याला सुरुवात

जयंत धुळप 

अलिबाग - मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणवासीयांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर "वाय "दर्जाच्या प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी 9 वाजता पनवेलकडून महाडकडे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा पाहणी दौरा सुरू केला आहे.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. सुमारे 15 लाख चाकरमानी गणेशभक्त विविध वाहनांतून कोकणात येत असतात अशा परिस्थितीत महामार्गाची नेमकी काय दुरुस्ती करणार हा प्रश्न कोकणवासीयांच्या मनात आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या त्रासाची प्रचिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः घेवून नाराजी व्यक्त केली होती. आज होत असलेल्या चंद्रकांत दादांच्या या दौऱ्याअंती खड्ड्यांचे विघ्न दुर होणार का? यांचे उत्तर मात्र काळच देवू शकणार आहे.

Web Title: chandrakant patil inspects potholes on mumbai goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.