गडावरून दगड डोक्यात पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 05:11 PM2018-06-06T17:11:53+5:302018-06-06T17:11:53+5:30

गडावरून दगड सुटून थेट डोक्यात पडल्याने रायगडवरून उतरत असलेल्या एका शिवभक्ताचा मृत्यू झाला. तर अशाच दुसऱ्या घटनेत अन्य एक शिवभक्त जखमी झाला आहे.

The death of a Shiva devotee fell on the stone from the fort, one injured | गडावरून दगड डोक्यात पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू, एक जखमी

गडावरून दगड डोक्यात पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू, एक जखमी

Next

- संदीप जाधव
महाड- गडावरून दगड सुटून थेट डोक्यात पडल्याने रायगडवरून उतरत असलेल्या एका शिवभक्ताचा मृत्यू झाला. तर अशाच दुसऱ्या घटनेत अन्य एक शिवभक्त जखमी झाला आहे. त्याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पायऱ्या उतरून येणाऱ्या शिवभक्तांची हत्ती तलाव ते महादरवाजादरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रत्येक शिवभक्ताला तो ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशोक दादा उंबरे (वय १९, रा. उळूप, ता. भूम, जि. उस्मानाबाद असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शिवभक्ताचे नाव आहे. अशोक शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर पाय-या उतरून खाली येत असताना गडावरून सुटलेला एक दगड थेट त्याच्या डोक्यावर आदळला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह नंतर महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान, दगड कोसळण्याच्या दुसऱ्या घटनेत अमित मांगरे (रा. खेड शिवापूर, जि. पुणे) हा तरुण जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर गड उतरण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. अरुंद पाय-या आणि अरुंद महादरवाजाच्या ठिकाणी शिवभक्तांना पुढे जाता येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताला तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील हे महादरवाजाजवळ गेले आणि त्यांनी शिवभक्तांना आवश्यक त्या सूचना देत ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले.

Web Title: The death of a Shiva devotee fell on the stone from the fort, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू