माणगावात विदेशी दारू जप्त
By Admin | Published: February 4, 2017 02:59 AM2017-02-04T02:59:22+5:302017-02-04T02:59:22+5:30
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती संघातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माणगाव काळ नदी पुलाजवळ पोलिसांनी जीपमधील विदेशी दारूचा ३ लाख २३ हजार ४७ रुपयांचा माल हस्तगत के ला.
माणगाव : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती संघातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माणगाव काळ नदी पुलाजवळ पोलिसांनी जीपमधील विदेशी दारूचा ३ लाख २३ हजार ४७ रुपयांचा माल हस्तगत
के ला.
घटनेची माहिती पोलीस शिपाई अल्पेश पवार (२६) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेतील आरोपी दत्ताराम लक्ष्मण चांदोरकर (४९, रा.साई, ता.माणगाव) व जीप चालक आश्रफ जाफर जालगावकर (२५, रा. साई, ता.माणगाव) हे एम.एच. ए झेड ९०६ या गाडीतून विदेशी दारू महाड बाजूकडून घेवून येत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबई- गोवा महामार्गावर लक्ष ठेवीत त्या गाडीचा पाठलाग करुन जीप माणगाव काळ नदी पुलाजवळ थांबविली. यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू, नवी संत्रा, वोडका गोल्ड, मॅकडॉल, बॅगपायपर, ब्लॅक लेबल, इम्पेरीयल ब्ल्यू, हायवर्ड, व्हिस्की अशा प्रत्येकी१८० मिलीच्या एकूण २४० बॉटल (क्वाटर्स) व जीप जप्त करून आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. ही कारवाई माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण वारे, पो.कॉ. मनीष ठाकूर, नीलेश ठाकूर, अल्पेश पवार यांच्या पथकाने केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव दत्ता नलावडे व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह कदम करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात हा दारु साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)