मच्छीमारी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी , कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्नशील : सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:37 AM2018-01-24T02:37:29+5:302018-01-24T02:37:51+5:30
रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. जिल्ह्यातील सहकार विभागाचा आढावा घेण्यासाठी विविध बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांनी सहकार खात्यातील विविध खात्यांच्या अधिकाºयांकडून आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशमुख बोलत होते.
अन्नाचा पोशिंदा म्हणून शेतकºयांची ओळख आहे. तो ज्या-ज्या वेळी आर्थिक संकटामध्ये सापडला, त्या वेळी सरकारने त्याला मदतीचा हात दिला आहे. शेतकरी शेतीमधून उत्पादन घेतात. त्याचप्रमाणे मच्छीमार देखील मासळीचे उत्पादन घेत असतो. त्यांनाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांनी विविध मच्छीमार संस्थांकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. मच्छीमारांवर उपासमारीची
वेळ येते. त्याचप्रमाणे संबंधित मच्छीमार संस्था अडचणीत येऊन अवसायानात जाण्याची शक्यता असते.
मच्छीमारांनाही आर्थिक संरक्षण देणे गरजेचे असल्याची मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. आमदार ठाकूर यांची मागणी योग्य आहे. मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी यासाठी मंत्रिमंडळ स्तरावरील बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांच्या या सकारात्मक निर्णयाने रायगड जिल्ह्यासह मासेमारी करणाºया महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना त्यांचा लाभ होणार असल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिल्यावर शेतकºयांपाठोपाठ मच्छीमारांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यामधील सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भात गिरण्या आणि काही ग्राहक संस्था या अवसायानात गेल्या आहेत. जिल्ह्यातील सहकार चळवळ टिकवण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असल्याने त्याबाबतही ठोस कार्यक्र म हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पेण अर्बनची कार्यवाही संथ
पेण अर्बन बँक बुडीत प्रकरणी कर्जदाराच्या मालमत्ता विकून खातेदारांना रक्कम देण्याची कार्यवाही अत्यंत संथगतीने सुरू असल्याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता कार्यवाही सुरू आहे, असेच मोघम उत्तर देशमुख यांनी दिले. सहकार मंत्री देशमुख रायगड जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना काही तरी चांगली बातमी मिळेल असे वाटले होते. मात्र, सहकार मंत्र्यांनी काहीच ठोस निर्णय न दिल्याने त्यांची घोर निराशा झाल्याचे दिसून आले.
११ हजार शेतकºयांना लाभ
शेतकरी कर्जमाफीमध्ये रायगड जिल्ह्यातील ११ हजार शेतकºयांना तब्बल २२ कोटी रु पयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध विकास कार्यकारी संस्थांमध्ये खातेदारांना जोडण्यात यावेत. यासाठी ८०६ महसुली गावांमध्ये एक विविध विकास कार्यकारी संस्था निर्माण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी दरवर्षी २० सहकारी संस्था या टेस्ट आॅडिटसाठी घेण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.