अलिबाग समुद्रकिनारी चार मीटरच्या लाटा
By admin | Published: July 7, 2016 02:31 AM2016-07-07T02:31:16+5:302016-07-07T02:31:16+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असतानाच गुरुवारी ७ जुलैला समुद्रात मोठे उधाण येणार आहे, असे आपत्ती विभागाने आधीच
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असतानाच
गुरुवारी ७ जुलैला समुद्रात मोठे उधाण येणार आहे, असे आपत्ती विभागाने आधीच जाहीर केले होते, मात्र यापूर्वी बुधवारी उधाणाच्या सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळलेल्या पहावयास मिळाल्या. या लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनीही अलिबागच्या समुद्रकिनारी गर्दी केली होती. उंच उसळणाऱ्या लाटांमुळे समुद्राने रौद्र रूप धारण केल्याचे दिसत होते. उधाण मोठे असल्याने समुद्रातील पाणी संरक्षक कठड्यांच्या बाहेर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.
३, ७, १९, २२ जुलै रोजी समुद्राला मोठे उधाण येऊन साडेचार मीटरच्या लाटा उसळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने आधीच जाहीर केले होते. त्याचप्रमाणे १ ते ४ आॅगस्ट, १९ आणि २२ आॅगस्ट, १, २, १७, २१ सप्टेंबर या दिवशीही लाटा उसळणार असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उंच लाटा उसळणार असल्याचे प्रशासनाने आधीच जाहीर केल्याने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रकिनारी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती. वेळ जसा पुढे सरकत होता तसा लाटांचा जोर वाढत होता. उत्साही पर्यटकांनी फेसाळलेल्या लाटा अंगावर घेत आनंद लुटला. पावसाच्या सरी कोसळत असताना दुसरीकडे समुद्राच्या पाण्यात भिजण्याचा मोह पर्यटकांसह स्थानिकांना आवरता आला नाही. (प्रतिनिधी)
पावसाची नोंद
सुधागड ६५
रोहा ४७
कर्जत २९.३०
तळा७२
खालापूर ६६
पेण४०
माणगांव ७६
पोलादपूर ११०
मुरु ड ५६
पनवेल ४५.८०
महाड ११२
अलिबाग १४
उरण १६.६०
म्हसळा ४५.२०
श्रीवर्धन ६५
माथेरान ६५
पावसाची नोंद
मिलीमीटरमध्ये